हूथं.. लेका ! काय हा काय’द्या’चा कारभार ; ज.जामोद तालुक्यात मूळ वारसदार वाऱ्यावर तर बनावट घेतोय जिगाव प्रकल्पाच्या भूमी संपादनाचा लाभ !

227

चौकशी झाल्यास मोठे घबाड बाहेर येणार; आझाद हिंदची जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायाची मागणी

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (23.May.2023) काय’द्या’ घ्या मुळे भारतामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आजरोजी प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचाराचे बिजे खूप खोलवर रोवली गेलेली आहेत. ती सहजासहजी समूळ नष्ट होतील, असे तरी वाटत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत आज मंगळवार 23 मे रोजी आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने ॲड.सतीशचंद्र रोठे यांनी मूळ वारसदार गुणाजी पाटील, मनोरमा हरीभाऊ उगले यासह मूळ वारसदार शेतकरी यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांना पुराव्यासह तक्रार दिली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही सदर तक्रारीत देण्यात आलेला आहे.

जळगाव जामोद तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतजमीनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या संगणमतातून बनावट नावाने हस्तांतरित करुन जिगाव प्रकल्पाच्या भूमी संपादनाचा लाभ घेत आहे. तर दुसरीकडे मूळ वारसदार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्या जात आहे. या अनुषंगाने एक वर्षापूर्वी चव्हाण, उगले कुटुंबीयांनी प्रस्तुत प्रकरण जिल्हाधिकारी यांना पुराव्यासह सादर केल्यानंतरही विवादित शेत जमिनींचे कलम 11 नुसार संपादन करण्यात येत आहे. सन 1901 ते 2005 पर्यंत कुळ कायद्यानुसार मूळ मालकाच्या नावावर सातबारा असतांना 2005 नंतर ह्यात नसलेल्या व्यक्तींच्या नावे खोडतोड करून बनावट सातबारे बनविण्यात आले आहेत. सदर बनावट दस्ताच्या नोंदी घेण्याची एकही पद्धत कायदेशीर नाही.गंभीर बाब म्हणजे सदर फेरफारच्या नोंदीचे दस्त संबंधित प्रशासन द्यायला तयार नाही. शासन आणि प्रशासनाच्या संगणमतातून शेकडो हेक्टर शेतींचा सातबारा बनावट व्यक्तींचे बनावट वारसदार बनवून त्यांच्या नावे करण्यात आले‌ आहे. मागील वर्षांपासून शासन प्रशासनास असंख्य तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. परंतु जाणीवपूर्वक सदर तक्रारीची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. सदर प्रकरणाच चौकशी झाल्यास असंख्य प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची मोठी नावे सदर बनावट दस्त शेती हस्तांतरण प्रकरणात समोर येणार असल्याचेही आझाद हिंद शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.