तंबाखू नियंत्रण पथकाची बुलडाण्यात कारवाई; 14 हजाराचा दंड वसूल!

151

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (23.May.2023) जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाने बुलडाणा शहरातील पानटपरी चालकांवर आज मंगळवार 23 मे रोजी कारवाई केली. यामध्ये 14 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पोलिस अधीक्षक सुनील कडासने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी  राठोड, पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वासेकर, ठाणेदार काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अंमलबजावणी पथकाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बुलडाणा शहरातील 58 पानटपरीधारकांवर कारवाई केली. यात 14 हजार 200 रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. लता भोसले, समुपदेशक सरकटे, सामाजिक कार्यकर्ता श्रीमती आराख, अन्न औषध प्रशासन विभाग वसावे, स्थानिक गुन्हे शाखेचे जुमडे, बोचे,  खेरडे यांनी ही कारवाई केली.

जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्हाभर गेल्या पाच वर्षापासून हृदयरोग, मधुमेह, अर्धांगवायू, कर्करोग या आजारांसाठी कारणीभूत तंबाखू व्यसनावर मार्गदर्शन, प्रशिक्षण, मुख तपासणी, मुख कर्करोगावरील मोफत शस्रक्रिया आदी उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयात जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष ओपीडी नंबर 33 व 34 येथे कार्यरत आहे. नागरिकांनी तंबाखू मुक्तीसाठी मोफत टोल फ्री क्रमांक क्र. 1800112356 व मुखस्वास्थासाठी मोफत टोल फ्री क्रमांक क्र. 1800112032 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.