सैलानी येथे बोकड्याचा नवस फेडण्यासाठी आलेले 407 वाहन पलटले; 17 जखमी

842

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (1.June.2023) अपघात केंव्हा व कधी होईल हे सांगता येत नाही. सैलानी येथे कठोरा बाजार येथील भाविक बोकड्याचा नवस फेडण्यासाठी येत असतांना 407 वाहन पलटी झाल्याने यामध्ये जवळपास 17 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सदर अपघात आज गुरुवार 1 जून रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास ढासाळवाडी येथे घडला. जखमी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने जिवीतहानी टळली.

प्राप्त माहितीनुसार बुलढाणा तालुक्यातील सैलानी येथे बोकड्याचा नवस फेडण्यासाठी कठोरा बाजार येथून आलेल्या 407 एम.एच.06 अेजी.599 वाहन आज 1 जून रोजी सकाळी 9.30 वाजेच्या दरम्यान सैलानी जवळ असलेल्या ढासाळवाडी गावाजवळ वाहन अचानक रस्त्यावर पलटी झाले. यावेळी वाहनामधील सर्व सामान व जखमी रोडवर पडले हेाते. यामध्ये आलेले 19 भाविक जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रायपूर पोस्टे.ठाणेदार राजवंत आठवले आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी हजर दाखल झाले. जखमी झालेल्यांना खाजगी वाहनाने जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. वृत्तेलिहेपर्यंत रायपूर पोस्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

407 वाहन पलटी झाल्याने यामध्ये प्रविण बलरावत इंदलसिंह बलरावत (वय 60), पायल बलरावत (वय 16),कोमल बलरावत (वय 13), तुळसाबाई मेहेर (वय 60)शीला बलरावत (वय 40), चेतन राजपूत (वय 10), श्रुती जॉन वाल (वय 6), अंजली बलरावत(वय 16) , चौसर खंडाळे (वय 60), मोहिनी बलरावत (वय 17), ऋतुराज बलरावत (वय 13), सतपाल बलरावत (वय 37) व कृष्णा मेहेर सर्व रा.कठोरा बाजार व अनिता देहाने (वय 35), कांताबाई देहाने (वय 60), विलास देहाने (वय 28), वैष्णवी देहाने (वय 18) सर्व रा.आडगाव वाडी या सर्व जखमेवर बुलढाणा जिल्हा रुग्णालयात उपचार चालू असल्याची माहिती समोर आली आहे.