तांदुळवाडीचा 28 वर्षीय गोपाल जुनारे महिनाभरापासून गेला कुठे?

749

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (31.May.2023) जिल्ह्यात महिला व मुलीप्रमाणे पुरुष बेपत्ता होण्याचे प्रमाण सुध्दा वाढले आहे. जिल्ह्यात 1 ते 31 मे या महिनाभराच्या कालावधीमध्ये 60 महिला-मुली तर 37 युवक व पुरुष बेपत्ता झाले आहे. त्यातील बोराखेडी पोस्टे.अंतर्गत असलेल्या तांदुळवाडी ता.नांदुरा येथील 28 वर्षीय युवक गोपाल ओंकार जुनारे हा 30 एप्रिल रोजी देवदर्शनासाठी जातो , असे सांगून गेला तो महिन्याचा कालावधी उलटला तरी परत आला नाही, अशा ओंकार जुनारे यांच्या फिर्यादीवरुन आज 31 मे रोजी बोराखेडी पोस्टे.ला मिसींग दाखल करण्यात आली आहे.

ओंकार नारायण जुनारे यांनी बोराखेडी पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा गोपाल ओंकार जुनारे (वय 28) हा 30 एप्रिल 2023 रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास पारस येथे दर्शनासाठी जातो असे सांगून दुचाकी एम.एच.28 अेएफ-7906 ने निघून गेला. त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतु तो एक महिन्याचा कालावधी उलटून देखील आढळून आला नाही, अशा फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टे.ला13-2023 नुसार मिसींग दाखल करण्यात आली आहे.

गोपाल जुनारे याचा रंग गोरा, बांधा सडपातळ, अंगात शर्ट व फुलपँट घातलेला आहे. उपरोक्त फोटोतील वर्णनाचा युवक आढळून आल्यास बोराखेडी पोलिस स्टेशन किंवा ओंकार नारायण जुनारे तांदुळवाडी ता.नांदुरा मोबाईल नं.9699306451 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.