बुलडाणा जिल्ह्याचा निकाल 93.90 टक्के;जिल्ह्यात मुली अव्वल 3.26 टक्क्यानी जिल्ह्याची टक्केवारी घटली

532

बुलढाणा (2.JUNE.2023) महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज शुक्रवार 2 जून रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर झाला. अमरावती विभागाचा निकाल 93.22 टक्के लागला असून विभागामध्ये बुलडाणा जिल्हा द्वितीय स्थानावर असून त्याची टक्केवारी 93.90 टक्के एवढी आहे. तर वाशिम जिल्हा प्रथमस्थानी असून त्याची टक्केवारी 95.19 टक्के एवढी आहे. बुलडाणा जिल्ह्यात सुध्दा मुलींच अव्वल असून मुलींची उर्त्तीण होण्याची 95.61 टक्के एवढी तर मुलांची टक्केवारी 92.49 एवढी आहे. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला. मागील वर्षी बुलढाणा जिल्ह्याचा निकाल 97.16 टक्के लागला होता, यावर्षी त्यामध्ये 3.26 टक्क्यांनी घट झाली आहे.

बुलढाणा तालुक्याचा निकाल 94.71 टक्के, मोताळा तालुका 95.43 टक्के, चिखली तालुका 96.01, दे.राजा 97.03 टक्के, सिंदखेड राजा 95.79 टक्के, लोणार तालुका 94.38 टक्के, मेहकर तालुका 94.27 टक्के, खामगाव तालुका 92.27 टक्के, शेगाव तालुका 91.76 टक्के, नांदुरा तालुका 91.24 टक्के, मलकापूर तालुका 93.12 टक्के, जळगाव जामोद तालुका 91.16 टक्के, संग्रामपूर तालुका 91.47 टक्के एवढा निकाल लागला आहे.

असा आहे अमरावती विभागाचा निकाल

अकोला जिल्हा 93.22 टक्के, अमरावती 92.92 टक्के, बुलढाणा 93.90 टक्के, यवतमाळ 91.49 टक्के, वाशिम जिल्हा 95.19 टक्के एवढा लागला आहे. यावर्षीही दहावीच्या निकालामध्ये अमरावती विभागात मुलींचं अव्वल राहील्या आहेत.