मदत न दिल्यास आंदोलन छेडणार; निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला इशारा
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (7.JUNE.2023) गतवर्षीच्या खरीपानंतर सष्टेंबर , ऑक्टोंबरचा सततचा पाऊस, शिवाय अतिवृष्टीने शेतकऱ्यांनी उडवलेली दाणादाण ,गारपीट या संदर्भात अहवाल जाऊनही जिल्हातील 15 हजार शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. ही नुकसान भरपाई केंव्हा मिळणार, असा सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख (उबाठा) जालींधर बुधवत यांच्या नेतृत्वात आज बुधवार 7 जून जिल्हा प्रशासनाला विचारला असून शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीकर्जासह मुबलक बी-बियाणे , खते खरीप हंगामासाठी मिळावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
बुलडाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस होऊन त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात सोंगलेल्या सोयाबीन सह इतर पिकाचे गुरेढोरे व पाळीव जनावरांचे सुध्दा नुकसान झाले होते. या निष्क्रीय राज्य सरकाराने आश्वासन देवून सुध्दा अद्याप पर्यत बरेच महीने उलटून सुध्दा कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही. सततच्या पावसाने सष्टेंबर, ऑक्टोंबर मध्ये नुकसान केले. गतवर्षीच्या या नुकसानीची मदत अद्याप प्राप्त झालेली नाही. जो पीक विमा आमच्या शेतकरी यांनी काढला त्या पीक विम्याचीच रक्क्म सुध्दा अद्याप काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. शासनाकडून स्थानिक पातळीवर सर्वे होऊन मदतीच्या निकषात बसणाऱ्यांच्या याद्या वरिष्ठस्तरावर गेलेल्या आहे. तरी देखील शेतकऱ्यांच्या मदतीला वेळ का लागतोय असेही जालींधर बुधवत यावेळी चर्चा करतांना म्हणाले. जून महीन्यामध्ये पेरणी सुरु होत असते याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. निवेदन देतांना जिल्हाप्रमुख महीला आघाडी सौ.जिजाबाई राठोड, विधानसभा संघटक अशोक इंगळे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, शहर प्रमुख हेमंत खेडेकर ,निलेश राठोड, गजानन उबरहंडे ,विजय इतवारे,अमोल शिंदे, सुनिल गवते, राजु मुळे, सदानंद माळी,डॉ अरुण फोफळे, नंदिनी रिंढे, रवि राजपुत,गणेश पालकर, शेषराव सावळे, हरी सिनकर यांचे सह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अन्यथा शिवसेना आंदोलन छेडेल !
जून महीना सध्या सुरु असून पेरणी तोडावर आली असतांना सुध्दा शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले नाही. तर काही बँक थकीत कर्जदारांना कर्ज भरुन सुध्दा पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत असून कर्ज देण्यात नकार देत असून सिबीलची नवी अट मुद्दामहून घालण्यात येत आहे. अश्या बँकावर तात्काळ कार्यवाही करुन शेतकऱ्यांना तात्काळ विनाअट व विना विलंब पिक कर्जाचे वाटप करावे. जेणे करुन शेतकऱ्यांना आपल्या पेरणीसाठी सोईचे होईल. खते व बि बियाणे सुध्दा मुबलक स्वरुपात उपलब्ध करुन देण्या यावे. अन्यथा शेतकरी हीत लक्षात घेता लोकशाही मार्गाने शिवसेना आंदोलन करेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.