अवकाळीने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 6 कोटींची मदत जाहीर!

404

मार्च-एप्रिलमध्ये जिल्ह्यातील 7006 शेतकऱ्यांचे 3532.21 हे.क्षेत्र झाले होते बाधीत !!

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (7.JUNE.2023) शासनाने अवेळी पाऊस ही आपत्ती जाहीर केली आहे. शेतीपिकाचे 33 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मार्च व एप्रिल 2023 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या शेतकऱ्यांना 222 कोटी 65 लक्ष 34 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यासाठी 6 कोटी 20 लक्ष 37 हजाराची रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मार्च व एप्रिल 2023 मध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील 220896 शेतकऱ्यांचे 124309.48 हेक्टरवरील क्षेत्र बाधीत झाले होते. त्या शेतकऱ्यांना 222 कोटी 65 लक्ष 34 हजार रुपयांची मदत शासनस्तरावरुन जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अमरावती विभागासाठी 43 कोटी 30 लक्ष 51 हजाराची मदत जाहीर करण्यात आली आहे. अवकाळीने बुलढाणा जिल्ह्यातील 7006 शेतकऱ्यांचे जवळपास 3532.21 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले होती, त्या शेतकऱ्यांना 6 कोटी 20 लक्ष 37 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सदर मदत निधी बँकेच्या कर्ज खात्यात अथवा वसुलीसाठी वळती करु नये, जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना तसे आदेश द्यावेत, असे शासन स्तरावरुन पारीत करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.