पिंपळपाटी येथे रानडुकराने महिलेला फाडले

1594

महिलेवर मलकापूर येथील चोपडे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (13.May.2023) खरीपाच हंगाम असल्याने शेतीच्या मशागतीचे कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. रविवार 11 जून रोजी मोताळा वनपरिक्षेत्र कार्यालय रोहिणखेड बिट अंतर्गत येणाऱ्या पिंपळपाटी येथे सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास 38 वर्षीय महिलेवर रानडुकराने अचानक हल्ला चढवून सौ.सुमन गायकवाड या महिलेस गंभीर केले आहे. सदर महिलेवर मलकापूर येथील डॉ.राहुल चोपडे हॉस्पीटलमध्य उपचार सुरु आहेत.

जून महिना सुरु झाल्याने मृगातच पेरणी व्हावी , यासाठी शेतकऱ्यांची शेतीकामाची मोठी लगबग सुरु आहे. भोरटेक शिवारात असलेल्या शेतात पिंपळपाटी येथील लक्ष्मण गायकवाड शेतात सऱ्या काढण्याचे काम करीत होते. 11 जून रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी सौ.सुमन लक्ष्मण गायकवाड ह्या त्यांच्या जेवणाचा डब्बा घेवून शेतात आल्या होत्या. दोघांनी सोबत जेवण केल्यानंतर लक्ष्मण गायकवाड हे सऱ्या काढण्याचे काम करीत होते, दरम्यान सौ.सुमनबाई शेतात झाडाखाली बसलेली असतांना अचनाक रानडुकराने पाठीमागून त्यांच्या पायावर हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. त्यांनी आरडाओरड केली त्याचे पती मदतीसाठी धावून आले असता तोपर्यंत रानडुक्कर पळून गेले होते, परंतु रानडुकराने त्यांच्या पायाला गंभीर जखमी केल्याने त्यांच्या मांड्यामधून मोठा रक्तस्त्राव सुरु असल्याने त्यांना तात्काळ मलकापूर येथील डॉ.राहूल चोपडे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सदर घटनेची माहिती त्यांचे पुतणे यांनी आज 13 जून रोजी मोताळा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना देताच वनक्षेत्रपाल नेहा मुरकुटे यांनी मलकापूर येथील चोपडे हॉस्पीटल जावून सुमनबाईची भेट घेवून विचारपूस केली. सदर महिलेला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना वनविभागाच्यावतीने आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.