BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (19 JUNE.2023) आज प्रत्येकजण स्वत:साठी जगतो, परंतु दुस-याच्या काहीतरी कामात पडावे, लोकांचे भले व्हावे यासाठी मोताळा तालुक्यातील जयपूर येथील एक व्यक्तीमत्व आहे, त्यांचे नाव आहे सारंगधर सातव, बोलायला डॅशींग तसेच गावाच्या विकासासाठी झपाटलेले व्यक्तीमत्व आहे. शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी आज सोमवार १९ रोजी सामाजिक कार्यकर्ते सारंगधर सातव व ग्रामस्थांनी मोताळा तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले असून मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मोताळा तालुक्यातील जयपूर गावामध्ये शासकीय जमिन आहे. पूर्वी शासकीय जमिनीवर गावातील बक-या, बैल, म्हैशी यासह आदी जनावरांच्या चराईसाठी बाराही महिने जमिन उपलब्ध होती. परंतु आता बाहेरील गावातील काही नागरिकांनी काही सत्ताधारी लोकांना हाताशी धरुन जयपूर येथील शासकीय जमिन सरकारच्या नावावर असतांना त्या जमिनी तयार करुन त्यावर पेरणी करीत आहेत. त्या जमिनीवर जर गावातील जनावरे गेली असता शिवीगाळ करुन जीवेनिशी मारण्याची धमकी सुध्दा ते चवताळलेले लोक देत आहेत. यामुळे गावातील शांतता भंग होवून भविष्यात मोठी घटना सुध्दा घडू शकते. गावातील ढेपाळलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाचे ग्रामसेवक यांच्या तक्रारी केल्या परंतु कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही. सध्या जयपूर गावात सरकारची एक एकर सुध्दा जमिनी उपलब्ध नाही. शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी जयपूर येथील समाजिक कार्यकर्ते सारंगधर निवृत्ती सातव व ग्रामस्थांनी आज १९ जूनपासून आमरण उपोषण सुरु केले असून आता मोताळा तहसिल प्रशासन शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणाNयांवर काय कारवाई करते, याकडे मोताळा तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.