पलढग येथील 22 वर्षीय विवाहिता दिड वर्षाच्या मुलीसह बेपत्ता !

512

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (19.JUNE.2023) राज्यासह बुलढाणा जिल्ह्यामध्ये महिला व मुलींचे बेपत्ता होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. जून महिन्यात 19 दिवसात 33 मुली व महिला बेपत्ता झाल्या आहेत. यामध्ये मोताळा तालुक्यातील पलढग येथील एक 22 वर्षीय विवाहिता आपल्या दिड वर्षाच्या मुलीसह 18 जून रोजी बेपत्ता झाली आहे. महिलेचे नाव सौ.वैशाली ठाकरे असे आहे. याबाबत आज 19 जून बोराखेडी पोस्टे.ला मिसींग दाखल करण्यात आली आहे.

वैशाली ठाकरे यांचे सन 2020 मध्ये मोताळा तालुक्यातील पलढग येथील शुभम शिवाजी ठाकरे यांच्यासोबत लग्न झाले होते. त्यांना दिड वर्षाची नित्या नावाची मुलगी आहे. 18 जून रोजी शुभम ठाकरे हे मजुरीचे काम करण्यासाठी बाहेरगावी गेले होते, दरम्यान दुपारी 4 वाजता फिर्यादीची भावजय मिरा ठाकरे यांना वैशालीने तब्येत खराब झाल्याने मोताळा येथे दवाखान्यात जावून येते, असे सांगून मुलगी नित्यासह निघून गेली होती. सायंकाळी 7 वाजले तरी घरी परत न आल्याने शुभम ठाकरे यांनी पत्नी व मुलगी नित्या हीची शेजारी व नातेवाईकांकडे विचारपूस केली. परंतु ती मिळून आली नसल्याचे शुभम ठाकरे यांनी बोराखेडी पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टे.ला मिसिंग नं 16/2023 दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहे.

बेपत्ता झालेल्या महीलेचे वर्णन..

वैशाली ठाकरे यांनी लाल रंगाची नवीन साड़ी, लाल रंगाचे ब्लाउज, गुलाबी रंगाची सॅण्डल, उंची अंदाजे 4.5 फुट, रंग गोरा, दाव्या हातावर K व कपाळावर गोधलेले आहे. नाकावर काळा चट्टा आहे . तसेच मुलगी नित्या हीचे हातात चांदीचे कडे, पायात चांदीच्या चैनपटया, कबरेवर हिरवा चट्टा, रंग गोरा, दोन्ही कान टोचलेले आहेत.