जून महिना संपत आला तरी बुलढाणा जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊसचं नाही झाला !

265

शेतकरी चिंताग्रस्त; जिल्ह्यात फक्त 7.6 इंच पावसाची नोंद

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (24.JUNE.2023) मागीलवर्षी जिल्ह्यात पावसाने जून महिन्यात दमदार हजेरी लावल्याने अनेकांच्या पेरण्या आटोपल्या होत्या. परंतु यावर्षी पाऊस लांबल्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांचे पेरण्या लांबणीवर पडल्या आहे. जून महिना संपत आला तरी बुलढाणा जिल्ह्यामध्ये केवळ 194.9 मि.मी. म्हणजेच 7.6 इंच पाऊस झाला असून तो मागील वर्षाच्या तुलनेत 33.3 इंच एवढा कमी आहे. मागीलवर्षी 24 जून पर्यंत 1040.8 मि.मी.म्हणजेच 40.9 इंच एवढा पाऊस झाला होता.

यावर्षी 24 जून पर्यंत जिल्ह्यामध्ये बुलढाणा तालुक्यामध्ये 7.9 मि.मी., चिखली तालुक्यात 17.9 मि.मी., देऊळगाव राजा 16.4 मि.मी., सिंदखेड राजा 18.8 मि.मी., लोणार 22.7 मि.मी., मेहकर तालुक्यात 33.4 मि.मी. म्हणजेच सर्वाधीक 1.3 इंच एवढा पाऊस झाला. खामगाव तालुक्यात 14.5 मि.मी., शेगाव तालुक्यात 5.7 मि.मी., मलकापूर तालुक्यात 17.6 मि.मी., नांदुरा तालुका 12.5 मि.मी., मोताळा तालुक्यात 23.7 मि.मी., संग्रामपूर 1.7 मि.मी. तर जळगाव जामोद तालुक्यात 2.1 मि.मी. पाऊस पडला आहे. मेहकर तालुका सोडला तर जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यात 1 इंच एवढा पाऊस सुध्दा पडला नाही.

मागीलवर्षाच्या पावसाची तालुकावाईज आकडेवारी

मागीलवर्षी सन 2022 मध्ये 24 जूनपर्यंत बुलढाणा तालुक्यात 3.90 इंच, चिखली तालुका 5.22 इंच, देऊळगाव राजा 4.6 इंच, सिंदखेड राजा 14.6 इंच, लोणार 3.4 इंच, मेहकर 5.54 इंच, खामगाव 2.9 इंच, शेगाव 2.5 इंच, मलकापूर 1.7 इंच, नांदुरा 1.5 इंच, मोताळा 2.1 इंच, संग्रामपूर 1.7 इंच तर जळगाव जामोद तालुक्यात 1 इंच एवढा पाऊस झाला होता.

पाऊस इंचामध्ये कसा मोजतात

भारतामध्ये सर्व भागामध्ये जून ते ऑक्टोबर हा पावसाचा कालावधी असतो. उत्तर भारतात हिमालयाच्या डोंगर रांगावर पाऊस हिमवर्षांवच्या स्वरूपातदेखील पडतो. पाऊस हा पाण्याचा उगम असल्यामुळे पाण्याच्या मोजणीचा विचार करीत असताना पावसाच्या मोजणीचे एकक हे मेट्रिक सिस्टीममध्ये मिलिमीटर तर ब्रिटिश सिस्टीममध्ये इंच (एक इंच म्हणजे २५.४ मिलिमीटर) आहे. बर्फाच्या स्वरूपातील पावसाची मोजणीदेखील याच एककात केली जाते. बुलडाणा जिल्ह्यात 24 जून पर्यंत 194.9 मि.मी. पाऊस झाला म्हणजे भागीला 25.4 म्हणजेच 7.6 इंच एवढा पाऊस बुलढाणा जिल्ह्यामध्ये पडला आहे.