मलकापूर बुलडाणा रोडवरील घटना; चालक-वाहकावर गुन्हा दाखल
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (9.JULY.2023) एकीकडे एसटी.महामंडळ तासभर वाट पाहीन, पण बसनेच प्रवास करीन, एसटीचा प्रवास सुखकर प्रवास, हात दाखवा बस थांबवा असा डांगोरा पिटत आहे. तर दुसरीकडे त्याच बसच्या निढावलेल्या चालकाने निष्काळजीपणे भरधाव बस चालविली तर वाहकाने बसचा दरवाजा बंद न केल्यामुळे मलकापूर ते बुलढाणा दरम्यान 2 जुलै रोजी गंगापूर छत्रपती संभाजीनगर डेपोच्या बसमधून प्रवास करणारी एक महिला परडा फाट्याच्या वळणावर बसमधून खाली पडून जखमी झाली. याप्रकरणी जगन्नाथ जाधव यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टे.ला आज 9 जुलै रोजी चालक-वाहकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगन्नाथ जाधव दसरखेड ता.मलकापूर यांनी बोराखेडी पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की, त्यांची बहीण ग. भा. सावीत्री सचिन ढेकळे मलकापूर ह्य गंगापूर छत्रपती संभाजीनगर डेपोच्या बस क्र.एम.एच-20 बी.एल 2175 मधून 2 जुलै रोजी मलकापूर ते बुलढाणा प्रवास करीत होत्या. दरम्यान परडा फाटयाचे पुढे बस चालक भरधाव वेगाचे बस चालविल्याने एका वळणावर जोराने बस वळविल्याने सावीत्री ढेकळे झटक्याने सीट वरुन बसचे दरवाज्यात पडली, त्यावेळी बसच्या वाहकाने बसच्या दरवाज्याकडे दुर्लक्ष करुन बसच्या दरवाज्याची कडी न लावल्याने दरवाजा उघडून सावीत्रीबाई बसच्या खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्या, अश्या जाधव यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टे.लाआरोपी चालक व वाहकावर भादंवीचे कलम 279, 337 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहे.
फलटण डेपोच्या चालक-वाहकाची अरेरावी
एसटी.बस ही प्रवाशांच्या सेवेसाठी हे बीद्र वाक्य घेवून चालते, परंतु काही मुर्ख कामचूकार चालक व वाहक बस खाली असतांना सुध्दा बस न थांबविता सुसाट वेगाने पळवित असल्याने एसटी.महामंडळाला मोठा तोटा सहन करावा लागतो. आज 9 जुलै रोजी सायंकाळी 6.15 वाजता फलटण डेपोची बस क्र.MH.06 S-8424 डेपोच्या मुर्ख वाहकाने मलकापूरकडे जाणारे 30 प्रवाशी उभे असतांना बुलढाणा येथील जयस्तंभ चौक येथे बस न थांबविल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव खाजगी वाहनाने प्रवास करावा लागल्याचे एका प्रवाशांने ‘बुलडाणा न्यूज अपडेट’ शी बोलतांना सदर चालक व वाहकाची संबंधित मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.