शेतात काम करणाऱ्या महिलेवर दोघा नराधमांनी केला अत्याचार!

63

BNU न्यूज.

चिखली(8JULY 2023) महिलांच्या सुरक्षेसाठी शासनस्तरावरुन शेकडो कायदे करण्यात आले आहे. परंतु कायद्यांची भितीच राहिली नसल्याने महिलांवरील अत्याचाराचा आलेख वाढला आहे. चिखली तालुक्यातील अमडापूर पोस्टे.अंतर्गत असलेल्या एका गावातील एक पिडीत महिला शेतात काम करीत असतांना दोधांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना 7 जुलै रोजी घडली. पिडीत महिलेच्या फिर्यादीवरुन आरोपींवर 376 D नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिखली तालुक्यातील अमडापूर पोलिस स्टेंशन अंतर्गत असलेल्या एका गावातील पिडीत महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की, ती त्या 7 जुलै रोजी सकाळी 10 वाजता शेतामध्ये गेली होती. पिडीतेचे पती व सासरे हे ट्रॅक्टर पेरणी यंत्र धेवून येणार होते. पिडीत शेतात काडीकचरा वेचत असतांना गावातील एक इसम जवळ येवून स्त्रीला लाजवेल अश्या भाषेत बोलून त्याने जमिनीवार पाडून अत्याचार केला. पिडीतेने वाचविण्याचा प्रयत्न केला असता, थोड्यावेळाने त्याचा सोबती येवून त्याने शरीर सुखाची मागणी करुन अत्याचार केला. यावेळी दोघांनी धमकी अत्याचार केल्याच्या फिर्यादीवरुन अमडापूर पोस्टे.ला दोन्ही आरोपीवर भादंवीचे कलम 376 D, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.