12 वर्षीय मुलाने वाचविले आई व बहिणीचे प्राण

53

काळ आला होता पण वेळ नाही; सर्पमित्र रसाळ आले मदतीला धावून !

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (10.JULY.2023) मृत्यू अटळ सत्य आहे, तो कोणाला कधी व केंव्हा येईल हे सांगता येत नाही. परंतु अनेकांचा काळ येतो पण वेळ आलेली नसल्याने त्यांना पुन्हा जीवनदान मिळते, त्याचाच एक प्रत्येय बुलढाण्यात आज सोमवार 10 जुलै रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास आला आहे. 12 वर्षीय भावाच्या सर्तकतेमुळे बहीण व आई कोब्रा सापाच्या तावडीतून सुखरुप बचावल्या आहेत. सर्पमित्र एस.बी.रसाळ यांना घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ काही मिनीटात घटनास्थळी पोहचून त्यांनी कोब्रा जातीच्या सापाला बरणीत कैद केले.

बुलढाणा मलकापूर रोडवरील महाबोधी बुध्दविहार धम्मगिरी बुलढाणा येथे एक कुटूंब संपूर्ण परिवारास राहते. 10 जुलैच्या रात्री 12 वाजेनंतर घरामध्ये खळखळ आवाज येत होता, हा आवाज उंदरांचा असेल असे कुटुंबीयांना वाटत होते. परंतु सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास एक भला मोठा कोब्रा जातीचा नाग 12 वर्षीय मुलाने आईच्या हातावर पाहिला, यावेळी त्याने समय सूचकता दखवित त्या महाविषारी सापाला बाजुला फेकले. परंतु त्याची बहीण बाजुला झोपलेली होती, तो तीच्या अंगावर पडल्याने तो मुलगा खुप घाबरला यावेळी त्याने पुन्हा हिंमत करुन लगेच सापाला पकडून बाजुला फेकले. हा थरारक अनुभव पाहून थोड्याच वेळात मोठी आरडाओरड झाली. सदर आवाज ऐकून सकाळी मॉर्निग वॉकला जाणारे प्रदिप डांगे हे घटनास्थळी पोहचून त्यांनी सर्पमित्र एस.बी.रसाळ यांना फोन करुन घटनेची माहिती दिली, यावेळी क्षणाचाही विलंब न करता रसाळ हे काही मिनटात घटनास्थळी पोहचून 3 फुट लांब असलेल्या कोब्रा सापाला पकडून बरणीत बंद केले. नागरिकांनी न घाबरतात, साप आढळून आल्यास त्याला न मारता संपर्क साधण्याचे आवाहन एस.बि.रसाळ (सर्पमित्र) विदर्भ अध्यक्ष, महाराष्ट्र सर्पमित्र सेना आघाडी, अध्यक्ष वन्यजीव संरक्षण व निर्सग पर्यावरण संस्था बुलढाणा यांच्यावतीने करण्यात आले आहे.