मी येतोय तुम्हीपण या..! वंचितचा गुरुवारी बुलढाण्यात ‘आक्रोश मोर्चा’!

53

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (11.JULY.2023) राज्यामध्ये दलित-मुस्लीम-अल्पसंख्यांकावरील अन्याय, अत्याचाराच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या नेतृत्वात गुरुवार 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता गांधी भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे.

महाराष्ट्रामध्ये दलित-मुस्लीम व अल्पसंख्यांकावरील अन्याय अत्याचाराच्या घटनेमध्ये मोठी वाढ झाली असून त्यांच्यावर अन्याय अत्याचार वाढत आहे. जरीन खानचा पोलिस कोठडीत खून करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन आरोपीला तात्काळ अटक करुन सेवेतून बडतर्फ करुन त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाखाची आर्थिक मदत, नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावच्या अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा, परळी तालुक्यातील कदम कुटूंबावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई तसेच रेणापूर येथील मातंग बांधवांचा खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा आदी न्याय्य मागण्यांसाठी ‘आकोश मोर्चा’ चे आयोजन करण्यात आले आहे. मी येतोय तुम्हीपण बहुसंख्येने व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी, महिला आघाडी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने करण्यात आले आहे.