दरोडा, चोरीतील अट्टल गुन्हेगार घेतात सैलानीत आश्रय ?

72

रायपूर पोलिसांनी घेतली लॉज व गेस्ट हाऊसची झाडाझडती !

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (26.JULY.2023) मागील काही वर्षाच्या गुन्हेगारीचा आलेख लक्षात घेता सैलानी येथे दरोडा, चोरीतील अट्टल गुन्हेगार येथे 500 ते 2000 हजार रुपयात रुम भाड्याने घेवून जालना , औरंगाबाद, जळगाव व इतर जिल्ह्यातील तसेच पर राज्यातील गुन्हेगार हे बाहेर गावी चोरी, जबरी चोरी ,दरोडा ई.असे गंभीर गुन्हे करून सैलानी येथे आश्रय घेऊन राहत असल्याच्या गोपनीय माहितीवरुन रायपूर पोलिसांनी 25 जुलै रोजी सैलानीतील लॉज व गेस्ट हाऊसची झाडाझडती घेवून मालकांनी ओळखीच्या पुराव्याशिवाय रुम भाड्याने दिल्यास मालकांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा रायपूर पोलिसांनी दिला.

ठाणेदार दुर्गेश राजपूत व त्यांचे पथक 25 जुलै रोजी सैलानी येथे अचानक पोलिस ताफ्यासह जावून लोजेस, गेस्ट हाऊस, मुजावर लोकांनी भाड्याने दिलेली घरे येथे भेट दिली. तेथे राहत असलेल्या लोकांची माहिती व झाडाझडती घेऊन त्यांचे आधारकार्ड चेक करीत लॉज मालक, घर मालक, मुजावर लोक यांना त्यांच्याकडे या लोकाबाबत काय कागदपत्र आहे किंवा त्यांची काय पार्श्वभूमी याबाबत विचारणा केली असता सदर मालक लोकांकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे किंवा परिपूर्ण माहिती नसल्याची बाब समोर आल्याने ठाणेदार राजपूत यांनी लॉज व घरमालकांना चांगलेच फटकारीत पुढे जर रुम भाड्याने घेणाऱ्यांचे ओळख पत्राबाबत पुरावे आढळून न आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा लॉज, गेस्ट हाऊस व रुम भाड्याने देणाऱ्यांना मालकांना दिला. सदर कारवाई रायपूर पोस्टे.चे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी पोलीस अधिक्षक सुनील कडासने, अप्पर पोलिस अधिक्षक बी.बी.महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी गुलाबराव वाघ यांचे मार्गदर्शनाखाली केल्याने ठाणेदार राजपूत यांचे कौतूक होत आहे.

ओळखीच्या पुरव्याविना रुम भाड्याने दिल्यास होणार कारवाई

सैलानी हे सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असल्याने सैलानी येथे महाराष्ट्रासह देशभरातून भाविक सैलानी येथे श्रध्देपोटी दर्शनासाठी दाखल होतात. उपचार कामी बरेच दिवस मुक्काम करीत असतात व त्यांना राहण्याची सोय येथील काही लॉजमालक तसेच मुजावर लोक यांनी कच्ची पत्र्याची घरे बांधून अशा लोकं ना 500 रू ते 2000 रू दराने घरे भाड्याने देतात. सैलानी येथे येणाऱ्या भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने याच गोष्टीचा काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक हे फायदा घेत बाहेर जिल्ह्यात किंवा दुसऱ्या राज्यात गुन्हे करून सैलानी येथे आश्रय घेत असल्याची माहिती तसेच अनेक आरोपींना येथून अटक करण्यात आलेले असल्याने सैलानी येथे गुंड प्रवत्तीचे लोक भाड्याने राहतात काय, असा प्रश्न भाविकांना पडला आहे. ओळखीच्या पुरव्याविना रुम भाड्याने दिल्यास लॉज, गेस्ट हाऊस मालकांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.