क्रुझरने दुचाकीला उडविले; दोघे जागीच ठार

79

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा(28JULY.2023) दवाखान्याच्या कामासाठी दुचाकीने बुलढाण्याकडे जाणाऱ्या दोन युवकांना क्रुझरने जबर धडक दिली. या धडकेत नांदुरा तालुक्यातील सिरसोडी येथील दोघे जागीच ठार झाल्याची घटना आज 28 जुलै रोजी दुपारी 2.15 वाजेच्या सुमारास घडली.

नांदुरा तालुक्यातील सिरसोडी येथील आत्माराम दुर्योधन भोलनकर (वय 30) व महेश मारोती मुऱ्हेकर (वय 35) दुचाकी क्र.एम.एच.14 एए-8161 या दुचाकीने दवाखान्याच्या कामासाठी आज शुक्रवार 28 जुलै रोजी दुपारी 2.15 वाजेच्या सुमारास बुलढाणाकडे जात असतांना त्यांना राजूर घाट्याच्या पहिल्या वळणावर बुलढाण्याकडून मोताळाकडे जाणाऱ्या क्रुझर क्र. एम.एच.14 एच.डी.-0867 ने धडक दिली. धडक एवढी भिषण होती की या धडकेत दोघेही रोडवर पडल्याने अतिरक्तस्त्राव होवून महेश मुऱ्हेकर व आत्माराम भोलनकर हे दोघेही जागीच ठार झाले. बोराखेडी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतकांना शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे पाठविण्यात आहे. महेश मुऱ्हेकरच्या भावाचा सुध्दा पाच ते सहा वर्षापर्वुी शॉक लागून दुदैवी मृत्यू झाला आहे. महेशच्या पश्चात पत्नी, 1 मुलगी, आई असा आप्त परिवार आहे.