सैलानीत अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या!

60

रायपूर ठाणेदार दुर्गेश राजपूत व पथकाची कारवाई

BNU न्यूज नेटवर्क
बुलढाणा(29JULY.2023)जगप्रसिध्द सैलानी येथे सैलानी बाबाचे दर्शन घेण्यासाठी भारत व राज्याभरातून शेकडो नागरिक येतात. काही श्रध्देपोटी येथे उपचारासाठी भाड्याने रुम घेवून देखील राहतात. याचाच फायदा दुसऱ्या जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगार व दरोडेखोर घेवून आश्रय घेत असल्याची माहिती रायपूर पोलिसांनी मिळाल्याने मोहरम मिरवणुकीतील बंदोबस्तावर असताना 28 जुलै रोजी ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी जाफ्राबाद येथील संशयीत विनायक दांडगे या अट्टल गुन्हेगाराला जेरबंद केले.

परराज्य व दुसऱ्या जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगार सैलानी येथे आश्रय घेत असल्याच्या माहिती वरुन रायपूर पोलिसांनी सैलानी येथे मागील दोन दिवसापूर्वी ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी शोध मोहिम राबविली होती. यावेळी पोलिस प्रशासनाने सैलानी येथे रुम भाड्याने देणाऱ्या लॉज, गेस्ट हाऊस मालकांना ओळखीचा पडताळणी केल्याशिवाय रुम भाड्याने देणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याचीच प्रचिती 28 जुलै रोजी रात्री 9.30 वाजेच्या दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन ठाणेदार दुर्गेश राजपूत व कर्मचाऱ्यांनी दुचाकी क्र.एम एच 21 बी एल 9579 वर फिरणाऱ्या संशयीत इसमास विचारपूस केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, यावेळी पोलिसांनी खाकी दाखविताच त्याने आपले नाव विनायक काशिनाथ दांडगे आधारखेडा ता.जाफराबाद जि.जालना असे असून भोकरदन येथून मोटार सायकल चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याचे गुन्हेगारी रेकार्ड तपासले असता त्याने जालना, औरंगाबाद, बुलढाणा जिल्ह्यात चोरी, घरफोडी तसेच बरेच गुन्हे केल्याची बाब माहिती समोर आली असून त्याने सदर मोटार सायकल भोकरदन येथून सहा महिन्यापुर्वी चारेल्याचे सांगितले असून भोकरदन पोस्टे.नोंद चोरीची नोंद आहे. आरोपी विनायक दांडगे याच्यावर कारवाई करून भोकरदन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सदर कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक सुनिल कडासणे, अपोअ. महामुनी, उपवी.पो.अधिकारी गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली रायपूर पोलिस निरीक्षक दुर्गेश राजपूत, पीएसआय. बस्तेवड, हेकाँ. साळवे, पोना. पालवे, पोकॉ. गव्हाणे, पोकाँ. दळवी, अरुण झालटे, अख्तर यांनी केली.

सैलानी बनले अट्टल गुन्हेगारांचे आश्रयस्थान
रायपूर पोलिसांनी ओळखपत्राशिवाय रुम भाड्याने दिल्याने घरमालकाची चौकशी करुन ओळखीचा पुरावा तपासून रुम भाड्याने देण्यात यावी, अन्यथा कारवाई करण्याची तंबी देण्यात आली. आणखी किती अट्टल गुन्हेगार, चोरटे सैलानीत आश्रम घेवून आपले नेटवर्क चालवित आहे. ते सैलानी येथेच का आश्रय घेतात याचा शोध पोलिस घेत आहेत. रायपूर पोलिसांच्या धडक कारवाईचे सैलानी येथील नागरिक व भक्तांनी कौतूक केले.