वाघजाळ फाटा वळणावर ट्रक पलटी; खडकी फाट्यापर्यंत वाहनांच्या लागल्या रांगा !

56

ट्रक काढण्याच्या प्रयत्नात दुसरा ट्रकही फसला

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (31.JULY.2023) एकीकडे अपघाताचे सुत्र सुरु आहे. अश्यातच 30 जुलैच्या मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास मोताळा-बुलढाणा रोडवरील वळणावर एक ट्रक पलटी झालेला होता. त्यावेळी दुसऱ्या ट्रक चालकाने ट्रक काढण्याच्या घाईगडबडीत दुसरा ट्रक सुध्दा फसल्याने खडकी फाट्यापर्यंत वाहनाचा रांगा लागल्याने वाहतूकीचा मोठा खोळंबा झाला आहे.

बुलढाणा-मोताळा मार्गावर पुणे-औरंगाबाद, चिखली, मेहकर जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतु 30 जुलैच्या मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास डॉ.शिंगणे यांच्या मळ्याजवळील वळणावर एक ट्रक पलटी झाला. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. रोडच्या बाजुला थोडी जागा असल्याने दुसऱ्या ट्रकवाल्याने त्या जागेतून ट्रक काढत असतांना दुसरा ट्रक सुध्दा फसल्याने रस्ताच बंद झाल्याने ट्रॉफीक जाम झाल्याने खडकी फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत. बोराखेडी पोलिस प्रशासनाने जेसीबी बोलविली परंतु एका जेबीसीने ट्रक निघत नसल्यामुळे दुसरी जेसीबी बोलाविण्यात आली आहे. वृत्तलिहेपर्यंत ट्रकला काढण्याचे काम सुरु होते.