खामगावातील संभाजी भिडे यांची सभा रद्द करण्यासाठी वंचित एकवटली !

53

निलेश जाधवांच्या नेतृत्वात पोलिस अधिक्षकांना दिले निवेदन

BNU न्यूज नेटवर्क
बुलढाणा(29JULY.2023) 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिवस नाही, तिरंगा आपला राष्ट्रीय ध्वज नाही, जन मन आपले राष्ट्रीय गीत नाही, असे वक्तव्य करणाऱ्यां संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांची 31 जुलै रोजी खामगाव येथे होवू घातलेल्या सभेबाबत वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून ती सभाच रद्द करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या नेतृत्वात 28 जुलै रोजी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

बुलडाणा जिल्हा राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या नावाने ओळखला जातो. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात या जिल्ह्याला आपण सर्व पुरोगामी आदराने पाहतो, जिल्ह्यात विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहे. एकंदरीत या जिल्ह्यात सामाजिक शांतता भंग करण्याचा उद्देशाने संभाजी भिडे गुरुजी यांची सभा सोमवार ३१ जुलै रोजी खामगाव येथील घाटपुरी येथे आयोजीत केला आहे. संभाजी भिडे याचा हा कार्यक्रम मागील काही बाबी लक्षात घेता रद्द करावा, ते सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम सातत्याने करत आहे. भिमा कोरेगाव दंगलपूर्व नियोजित भिडे व एकबोटे या दोघांनी घडून आणली असून भिडे मास्टरमाईंड असल्याचा आरोप निवेदनात वंचितने केला असून खामगावातील सभा रद्द करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली.

संभाजी भिडे युवकांचे माथी भडकवितात-वंचितचा आरोप

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचे पांघरून घेऊन त्यांचा इतिहास व कार्य विखारी पध्दतीने सांगून काही विशिष्ट समाजातील युवकांची माथी भडकावण्याचे काम संभाजी भिडे करत आहे. असंवैधानीक वक्तृत्व पटाईत असलेली विकृती धारकवृत्ती असलेली, माथेफिरू असलेला व्यक्तिमत्व म्हणून भिडे प्रसिध्द असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.