BNU न्युज नेटवर्क
मोताळा (2Aug. 2023) शिक्षण, क्षमता, कर्तव्याचा त्रिवेणी संगम म्हणजे गुरुजी हा शब्द सर्वांच्या तोंडी येतो. शिक्षक विद्यार्थी घडविण्याचे प्रमाणिक काम करतो, परंतु त्याच सेवानिवृत्त शिक्षकाचे शेजारील दोन चोरट्यांनी 70 हजाराचे दागिणे लंपास केल्याची घटना मोताळा तालुक्यातील पुन्हई येथे काही दिवसापुर्वी घडली असून आज 2 ऑगस्ट रोजी दोन चोरट्यांवर बाराखेडी पोस्टे.ला सेवानिवृत्त गुरुजींच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोराखेडी पोस्टे.अंतर्गत असलेल्या मोताळा तालुक्यातील पुन्हई येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक नारायण रामकृष्ण सहावे यांनी आज बुधवार 2 ऑगस्ट रोजी बोराखेडी पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या घराशेजारी राहणारे शिवप्रसाद विश्वनाथ सहावे व अजय मोतीराम सुरडकर रा.पुन्हई यांनी सोन्याचा खडा 1 तोळा 30 हजार, सोन्याचे वेल 5 ग्रॅम 15 हजार , सोन्याची अंगठी 5 ग्रॅम 15 हजार, सोन्याचे गहु मणी 15 नग 6 हजार, सोन्यांची लहान बाळांची अंगठी 1.5 ग्रॅम 4500 रुपये असा एकूण 70 हजार 500 रू. चे सोन्याचे दागिणे 23 ते 30 जुलै दरम्यान कुलूपाची डुप्लीकेट चाबी घेवून कुलूप तोडून दागिणे चोरुन नेल्याच्या फिर्यादीवरुन आरोपी शिवप्रसाद सहावे, अजय सुरडकर यांच्यावर बोराखेडी पोस्टे.ला भादंवी कलम 457, 380, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नापोकॉ.अमोल खराडे हे करीत आहे.