आधी मुलाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला; बापाने तर एक साथीदारासह मुलीलाच पळविले !

60

नांदुरा पोस्टे.ला अपहरणाचा गुन्हा दाखल !!

BNU न्यूज नेटवर्क..
नांदुरा (1Aug.2023)शासनस्तरावर महिलांच्या सुरक्षेसाठी शेकडो कायदे करण्यात आली आहेत. परंतु त्या कायद्याची पाहीजे तशी अंमलबजावणी होत नसल्यामुळे महिलांवर होणारे बलात्कार, लैंगिक शोषणाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. नांदुरा पोस्टे.ला दाखल असलेल्या एका गुन्ह्यात प्रथम मुलाने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला तर त्याच्या बापाने एका साथीदारासह त्या पिडीतेचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिडीतेच्या आईच्या फिर्यादीवरुन नांदुरा पोस्टे. दोघा संशयीत आरोपींवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीतेच्या आईने 31 जुलै रोजी नांदुरा पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या 17 वर्षीय मुलीवर आरोपी सारंगधर कहाते याने सन 2021 मध्ये बलात्कार केला होता, त्याबाबत दसरखेड पोस्टे.सन 2021 मध्ये भादंवीचे कलम 376, (3), 506, बाल लैंगिक अत्याचार कायदा 2012 कलम 4,8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अत्याचारामुळे पिडीतेची मानसिक संतुलन बिघडल्याने तिच्यावर अकोला येथे उपचार चालू आहेत. प्रकरण बोर्डावर आल्याने आरोपी सारंगधर कहाते व प्रभाकर कहाते व अंबादास तायडे यांनी फिर्यादीच्या भावाला केस मागे घेण्याच्या धमक्या देत होते. 30 जुलै रोजी त्यांनी रात्री 9 वाजेच्या सुमारास फिर्यादीची पिडीत मुलगी बाहेर गेली असता ती परत आली नसल्याचे फिर्यादीत म्हटले असून त्यांच्या पिडीत मुलीला आरोपी सारंगधर कहातेचे वडील प्रभाकर कहाते व अंबादास तायडे यांनी मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशय व्यक्त केल्याने नांदुरा पोस्टे.ला उपरोक्त दोन्ही संशयीतांवर भादंवीचे कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नांदुरा पोलिस करीत आहेत.