अमडापूर पोलिसांनी 40 हजाराची गावरान दारु पकडली!

53

BNU न्युज नेटवर्क
अमडापूर (2Aug. 2023) चिखली तालुक्यातील अमडापूर पोलिसांनी गोपनीय माहितीवरुन सावरखेड नजिक शिवारात धरणाजवळ दोन आरोपीकडून 40 हजर 850 रुपयांची हात भट्टीची दारु पकडली. सदर धडक कारवाई आज 2 ऑगस्ट रोजी ठाणेदार सचिन पाटील व त्यांच्या पथकाने केली.

हातभट्टीची दारु पिण्यासाठी लोक शहरातून खेड्यागावात जातात, त्याला कारणही तेवढेच मोठे आहे. तेथे मोहफुलाची गावरान दारु मिळते, ती पिण्यासाठी ते शहरातून गावात जातात. अमडापूर पोस्टे.अंतर्गत असलेल्या सावरखेड नजीक येथे हातभट्टीची दारु पाडल्या जात असल्याच्या गोपनीय माहितीवरुन अमडापूर पोस्टे.सपोनी.सचिन पाटील, पोकॉ. दिपक मगर, पोकाँ.गजानन रापजूत, पोकाँ.रंजीत सरोदे, पोकाँ.प्रदिप चोपडे यांनी आज 2 ऑगस्ट रोजी सकाळी-सकाळी 6.30 वाजता चहा घेण्याच्यावेळी सावरखेड नजिक शिवार धरणाजवळ धाड टाकून आरोपी सुनिल बबन नाटेकर व छगन बबन नाटेकर रा.कव्हळा यांच्याकडून 30 लिटर हातभट्टीची 3 हजाराची दारु, मोहफुल व इतर साहित्य असा एकूण 40 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोकाँ.गजानन राजपूत यांच्या फिर्यादीवरुन अमडापूर पोस्टे.ला सुनिल नाटेकर व छगन नाटेकर यांच्यावर भादंवीचे कलम 65 ई,फ,ब,क महाराष्ट्र दारु बंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.