रोहिणखेड येथे बालविवाह लावल्याने ‘नवरोबा’सह आई-वडिलांवर गुन्हा दाखल !

98

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा-(4Aug.2023)बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरी सुध्दा अनेक बालविवाह होतात, परंतु तक्रारी अभावी बालविवाह करणाऱ्यांवर पोलिस प्रशासनाला कारवाई करणे शक्य होत नाही. गुरुवार 3 ऑगस्ट रोजी मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे मागील महिन्यात बालविवाह लावून दिला, अशा रोहिणखेड ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वैराळकर यांच्या फिर्यादीवरुन धा.बढे पोस्टे.ला नवरदेवासह त्याच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार धा.बढे पोस्टे.अंतर्गत असलेल्या रोहिणखेड येथील एका मंदिरावर बुलढाणा तालुक्यातील एका गावातील 15 अल्पवयीन मुलीचा विवाह शिवाजी विलास गायकवाड (वय 19) याच्यासोबत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतांना सुध्दा मागील महिन्यात विवाह लावून देण्यात आला. याप्रकरणी गुरुवार 3 ऑगस्ट रोजी रोहिणखेड ग्रामविकास अधिकारी यांच्या फिर्यादीवरुन धा.बढे पोलिसांनी नवरदेव शिवाजी विलास गायकवाड व त्याचे वडील विलास बाबुराव गायकवाड व आई सौ.प्रमिलाबाई विलास गायकवाड सर्व रा.रोहिणखेड यांच्यावर धा.बढे पोस्टे.अप. क्र. 222/2023 कलम 9,10,11 बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार कारवाई करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुखदेव भोरकडे हे करीत आहेत.