14 वर्षीय मुलीला पळविले; अपहरणाचा गुन्हा दाखल !

53

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा-(6 Aug.2023) जिल्ह्यामध्ये महिला व मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. धा.बढे पोस्टे.अंतर्गत असलेल्या मोताळा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी घाटावरील लोणार येथील क्रिष्णा शिंदे याच्यावर पिडीत मुलीच्या वडिलाच्या फिर्यादीवरुन 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोताळा तालुक्यातील एका गावातील पिडीतेच्या वडिलांनी आज 6 ऑगस्ट रोजी धा.बढे पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, त्यांची 14 वर्ष 7 महिन्याची मुलगी घरी आली नसल्यामुळे तिचा गावात व नातेवाईंकाकडे शोध घेतला, परंतु ती आढळून आली नाही. तिला लोणार येथील क्रिष्णा किशोर शिंदे याने पळवून नेल्याची फिर्याद दिली असून त्याच्यावर संशय व्यक्त केल्याने आरोपी क्रिष्णा शिंदे याच्यावर धा.बढे पोस्टे.ला भादंवीचे कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस करीत आहे.