दे.राजा पोलिसांनी 10 जुगाऱ्यांना पकडले; साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त !

82

वनविभागाच्या जंगलात चालू होता ‘एक्का बादशाह’चा डाव

BNU न्यूज नेटवर्क..
दे.राजा (8 Aug 2023) सध्या जिल्ह्यामध्ये अवैध धंदे तसेच गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे, तर अनेक गूंड व चोरटे आजही फरारच आहेत. मात्र देऊळगाव राजा पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरुन धडकेबाज कारवाई करीत वनविभागाच्या जंगलामध्ये एकांतात सुरु असलेल्या जुगारावर धाड टाकून 10 जुगाऱ्यांना पकडून त्यांच्याकडून रोख 9050, 22 रुपयांचे तीन मोबाईल, 8 मोटार सायकली असा एकूण 3 लक्ष 46 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन जुगाऱ्यांवर महाराष्ट्र प्रतिबंधक अधिनियम 1887 अन्वये कलम 12 अ नुसार कारवाई करण्यात आली. तर दोघे पोलिसांच्या हातावर तुरी देवून फरार झाले.

देऊळगाव राजा येथील वनविभागाच्या गारगुडी शिवारामध्ये जुगार सुरु असल्याची गोपनीय माहितीवरुन पोलिसांनी 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी पोलिस उपनिरीक्षक दत्ता नरवाडे, पोहेकाँ.विश्वनाथ काकड, पोना.सैय्यद, संजय गोरे, गणेश जायभाये यांनी पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी 6.45 वाजता ॲक्शन मोडवर येत खाजगी मोटार सायकलने घटनास्थळी पोहचून धाड टाकली असता त्यांना 200 व 500 रुपयावर एक्का बादशहा खेळतांना जुगारी आढळून आले. पोलिसांनी जुगारी प्रकाश गंगाधर सोनुने (वय 34 ) रा.पांग्री, प्रविण मल्हारी काकड (वय 24 ) रा.गारगुंडी, सचिन दिलीप डोईफोडे (वय 30) रा.सिनगाव जहागीर, रवि उध्दव जाधव (वय 18) रा.मेहूणा राजा, सिध्दांत आनंदराव खांडेभराड (वय 30) रा.माळीपुरा दे.राजा यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले तर काही जुगारी पोलिसांना चकमा देवून पळून जाण्यात यशस्वी झाले होते. परंतु पकडलेल्या जुगाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी विठ्ठल आत्माराम बंगाळे जहागगीर सिनगाव, एकनाथ शेषराव काकड रा.गारगुंडी, एम.एच.28 बीएल-2294 चा मालक अमोल धोंडीराम काकडे रा.मेहूणा राजा, एम.एच.28 अेडल्ब्यू.5450 राजू ज्ञानवा मिसाळ रा.गारगुंडी यांना पोलिसांनी पकडले. तर धटनास्थळावर आढळून आलेल्या मोटार सायकल एम.एच.28 अएल.6597 चा मालक, एम.एच.28 बीएन.8854 चा मालक मुकेश काकडे असे दोघे पळून गेले. पोलिसांनी जुगाऱ्यांकडून रोख 9050 रुपये, ताशपत्ता 50 रुपये, 22 हजार रुपये किमतीचे 3 मोबाईल, 3 लाख 15 हजार रुपये किमतीच्या 8 मोटार सायकल असा एकूण 3 लक्ष 46 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोकाँ. माधव कुटे यांच्या फिर्यादीवरुन देऊळगाव राजा पोस्टे.ला महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 कलम 12 A नुसार कारवाई करण्यात आली.

वनविभागाच्या जंगलात जुगार चालतोच कसा?

वनविभागाच्या जंगलात जाणे गुन्हा आहे, असे असतांना गारगुडीच्या जंगलात लाखो रुपयांचा जुगार देऊळगाव राजा पोलिसांनी पकडल्याने वनविभागाच्या संबंधित अधिकऱ्यांची या जुगाराला छुप्पी परवानगी तर नाही ना? असा प्रश्न या अनुषंगाने सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.