जहागीरपुरच्या शाळेला गुरुजी देता का कुणी, गुरुजी?

55

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा(7Aug.2023)सध्या जिल्हा परिषद शाळेचा शिक्षणाचा दर्जा सुधारीत आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागातील शाळांना शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होत असल्याने पालकांवर शाळेला गुरुजी देता का कुणी? गुरुजी अशी म्हणण्याची वेळ आली आहे. शाळेला शिक्षक देण्याची मागणीच मोताळा तालुक्यातील जहागीरपूर येथील पालकांनी आज 7 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी बुलढाणा यांच्याकडे केली आहे.

जहागीरपूर येथील शाळेत दोन शिक्षक आहेत. त्यातील रवि वाध या शिक्षकाची जिल्हा परिषदमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे 12 जुलै 2023 पासून शाळेत नियमीत शिक्षक नाही. एकाच शिक्षकावर कार्यालयीन व अध्यापन या दोन्ही कामांचा भार पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाने कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी बालकांना प्राथमिक शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेवून तो अमलात आणला गेला आहे. परंतु मोताळा तालुक्यातील जहागीरपूर येथे शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची पाळी आली आहे. येथील शाळेत पुर्वीप्रमाणे दोन शिक्षकांची गरज असल्याने शाळेला शिक्षक देण्याची मागणी शिक्षणाधिकारी बुलढाणा यांच्याकडे रविंद्र गुणाजी, सुधिर चोपडे, दिपक निंबोळकर, प्रमोद चोपडे, पुंजाजी चोपडे, सुनिल खर्चे, सौ.आशा चोपडे, पुरुषोत्तम पर्वेते, शे.आसिफ शे.कय्युम, रफिकशहा उस्मानशहा, भास्कर इंगळे यांच्यासह शेकडो पालकांच्या स्वाक्षऱ्या आहे.