मराठ्यांनी आगामी मोर्चे पुढाऱ्यांच्या घरावर काढावे-सुनिल जवंजाळ पाटील

54

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (13.Sep.2023) मराठा समाज हलाखीची जीवन जगत असताना नेते मात्र ‘सुलताना’ सारखे हे ऐशोआरामी जीवन जगत आहे. एकीकडे आरक्षणासाठी समाज पेटून उठत आहे तर दुसरीकडे नेते थंडच आहेत. सत्तेच्या बुडाला चिकटलेल्या मुंगळ्यांसारखे नेत्यांची अवस्था झाली आहे. समाज हिताचा विचार असेलतर मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री शिंदे पवार यांनी सत्तेला लाथ मारुन समाजाच्या आमदारांनी देखील राजीनामा देण्याचे आवाहन, मराठा समाजाचे नेते सुनील जवंजाळ पाटील यांनी केले.

राज्यभर मराठा सोयरीकच्या माध्यमातून सुनिल जवंजाळ पाटील समाज जोडण्याचे कार्य करीत आहे. त्यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मराठा समाजाचा घात धनिक मराठ्यांनी केला आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणासाठी जीवापाड प्रयत्न केले. मात्र त्यांच्या हयातीत आरक्षण मिळू शकले नाही. तेव्हाही सत्तेच्या भुकेने लालची नेते गप्पच (मुंग) गिळून होते. आण्णासाहेबांसोबत ते राहिले नाही. आज समाज आरक्षणासाठी पेटून उठला असताना समाजाचे आमदार, खासदार मात्र खुर्चीच्या बुडाला चिकटले आहेत. या नेत्यांना काही वाटत असेल, समाजाचा कळवळा असेल तर त्यांनी सत्तेवर पाणी सोडावे, असे पाटील यांनी म्हटले आहे.

आमदार खासदार काय करत आहे?

समाज आज मोर्चे काढत आहे. ते रास्तआहे. रस्त्यावर तो व्यक्त केला जात असेल तर ते हवेच आहे. रस्त्यावरची लढाई लढणारे क्रांतिकारक ठरले. हेच मोर्चे जर नेत्यांच्या घरावर काढले तर ते दिल्लीला पळतील आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. किती खासदारांनी केंद्राकडे आग्रही भूमिका घेतली आणि जर घेतली नसेल तर अशा नेत्यांना समाजाने भविष्यात जाब का विचारू नये, असे जवंजाळ पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.