मुर्ती येथे 72 वर्षीय वृध्दाची आत्महत्या

52

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (13.Sep.2023) तालुक्यातील मुर्ती येथील 72 वर्षीय वृध्दाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवार 13 सप्टेंबर दुपारी 2 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृतकाचे नाव हरिभाऊ हावरे असे आहे.

मुर्ती येथील हरिभाऊ रामचंद्र हावरे (वय 72) वर्ष यांनी आज 13 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास गावातील नदीत विष प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच त्यांचा मुलगा सुनिल हावरे यांनी त्यांना पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे हलविण्यात आले होते, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण मात्र समजू शकले नाही. गुरुवार 14 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता त्यांचे शवविच्छेदन करण्यात येणार असून 11 वाजता त्यांच्यावर मुर्ती येथील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 3 मुली, सुना व नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.