मोताळ्यात मराठा बांधवांचे उपोषण पाचव्या दिवशीही सुरुच !

57

दोघांची तब्येत खालावली; 5 जणांनी मुंडन तर महिला सरपंच
यांनी राजीनामा देवून दिला पाठींबा !

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (13 Sep.2023) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सुरु केलेल्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी मोताळा येथे 8 सप्टेंबर रोजी रावसाहेब देशमुख, सुनिल कोल्हे, शुभम घोंगटे, अमोल देशमुख, निलेश सोनुने, ओमप्रकाश बोर्डे यांनी उपोषण सुरु केले. 12 सप्टेंबर पाचव्या दिवशी शुभम घोंगटे व निलेश सोनुने यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सलाईन घेवून ते परत उपोषणस्थळी पोहचले. 5 जणांनी मुंडन तर पिंपळगाव देवी सरपंच शोभाबाई तेजराव वाघ पाटील यांनी सरपंचपदाचा राजीनामा देवून पाठींबा दिला आहे.

मोताळा येथे रावसाहेब देशमुख, सुनिल कोल्हे, शुभम घोंगटे, अमोल देशमुख, निलेश सोनुने, ओमप्रकाश बोर्डे यांनी 8 सप्टेंबर रोजी सुरु केलेल्या उपोषणाला जिजाऊ बिग्रेड, स्वाभिमानी शेतकरी संघटना, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद, मुस्लीम शहा फकीर समाज संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विदर्भ खांदेश मातंग परिवर्तन संघटना, वंचित बहुजन आघाडी, गवळी समाज सेवा, काँग्रेसच्या म.प्र.सचिव जयश्रीताई शेळके, राजर्षी शाहू मल्टीस्टेट संस्था , वंचित बहुजन आघाडी, उबाठा शिवसेना, समतेचे निळे वादळ, आ.राजेश एकडे, दामोधर शर्मा, रशीद खाँ जमादार, राकाँ.(शरद पवार गट)जिल्हाध्यक्षा रेखाताई खेडेकर, मोताळा तालुका युवक काँग्रेस, कुल जमाती तहरीक मोताळा, शर्वरीताई तुपकर, अस्तीत्व संघटना, वैरशेव लिंगायत समाज मलकापूर, मेहत्तर वाल्मीकी समाज, मोहन पाटील, ॲड.संजय राठोड, बाबासाहेब भोंडे, जिल्हा वकील संघ बुलढाणा अध्यक्ष ॲड.विजय सावळे, विजय पाटील, शे.जाबीर, रयत क्रांती संघटना, ग्रा.पं.किन्होळा, शिव स्वराज्य बहुजन संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना, ग्रा.पं.कोल्ही गवळी, मोताळा तालुका भातृमंडळ, महिला काँग्रेस जिल्हाअध्यक्ष, एमआयएम अशा अनेक संघटना व राजकीय पक्षांनी पाठींबा दिला. तर 11 सप्टेंबर रोजी आ.संजय गायकवाड यांनी उपोषणस्थळी भेट देवून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे सर्व पक्षांना सोबत घेवून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा निकाली काढतील, असा विश्वास व्यक्त केला. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी 11 सप्टेंबरच्या रात्री उपोषणस्थळी मुक्कामी राहून पाठींबा जाहिर केला, 12 सप्टेंबर रोजी राकाँ.नेते एकनाथराव खडसे, माजी आमदार चैनसुख संचेती यांनी उपोषणस्थळी भेट देवून पाठींबा दिला.

5 जणांनी मुंडन करुन दिला पाठींबा..

मोताळा येथे आरक्षण व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यासाठी मराठा बांधवांनी उपोषण सुरु केले, त्यातील दोघांची प्रकृती आज 12 सप्टेंबर रोजी खालावल्याने त्यांना उपचारार्थ मोताळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपोषणकर्ते शुभम घोंगटे व निलेश सोनुने यांनी सलाईन घेवून ते उपोषणस्थळी पोहचले. प्रेम अनंता कोल्हे, ओम पुरुषोत्तम कोल्हे, दिलीप त्र्यंबक कोल्हे, शामराव पुंजाजी कोल्हे, किशोर प्रभाकर चोपडे यांनी मुंडन करुन उपोषणाला पाठींबा दिला आहे