‘ब्रेक के बाद’ चोरटे झाले सक्रीय… तिघ्रा येथे अपयशी; परंतु खरबडीत मारला सव्वा लाखाचा डल्ला !

84

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (24.Sep.2023) बोराखेडी पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या गावात चोरटे ‘लंबे ब्रेक के बाद’ सक्रीय झाले आहेत. तिघ्रा येथे चोरी झाल्याची घटना 23 सप्टेंबरच्या रात्री घडली होती. परंतु आकडा मात्र समोर आला नाही. मात्र, 24 सप्टेंबरच्या रामपाहरी चोरट्यांनी आपला मोर्चा खरबडी गावाकडे वळवीत तेथील राहुल किनगे यांच्या घराची कडी तोडून घरातील 1 लाख 16 हजाराचे सोन्याचे दागीणे व रोख 9 हजार 500 रुपये रोख असा 1 लाख 25 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यामुळे खरबडीसह परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोताळा तालुक्यातील 3 कि.मी. अंतरावर असलेल्या तिघ्रा येथे 23 सप्टेंबरच्या रात्री चोरी झाल्याची माहिती आहे, परंतु कितीची झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे. नंतर ‘लंबे ब्रेक के बाद’ चोरट्यांनी आपला मोर्चा खरबडी गावाकडे वळतील तेथील राहुल राजेंद्र किनगे यांच्या घराचे पाठीमागील लोखंडी गेटची कडी तोडून खिडकीतून हात घालून घरात प्रवेश केला. आणि नंतर ‘ना भय ना भिती’ हम है यहाके सिंकदर प्रमाणे लोखंडी कपाटातील सोन्याची गहुपोत 60 हजार, दोन अंगठया 22 हजार, कानातील चार जोड 10 हजार, कानातील टाप्स 6 हजार, गहुमणी 4 हजार, बाळाचे कानातील 6 हजार , सोन्याची नथ 6 हजार, देविचे नथ 2 हजार व लाकडी कपाटा ठेवलेले नगदी 9 हजार 500 रुपये असा एकूण 1 लक्ष 25 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल त्यांनी लंपास केला. चोरट्यांनी 23 सप्टेंबरच्या रात्री तिघ्रा येथील आदेश ओंकार सोनोने यांच्या घरात सुध्दा चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. परंतु कितीची चोरी केली हे मात्र गुलदस्त्यातच आहे. राहुल किनगे यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवीचे कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नापोकाँ.अमोल खराडे हे करीत आहे.