वरली, मटका व अवैध धंद्याविरोधात महाविकास आघाडी एकवटली! जिल्हा मुख्यालयी असलेले अवैध धंदे बंद न झाल्यास ‘तीव्र’ आंदोलन छेडणार !

44

अवैध धंद्यातून पोलिस विभाग लाखोची माया जमा करतात-महाविकास आघाडीचा आरोप

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (25.Sep.2023) जिल्हा मुख्यालयी सुरु असलेल्या अवैधविरोधात महाविकास आघाडी एकवटली असून बुलढाणा शहरातील अवैध धंदे व वरली मटका बंद करण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा आज 25 सप्टेंबर रोजी जिल्हा पोलिस अधिक्षकांना विधान परिषद आ.धिरज लिंगाडे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, जयश्रीताई शेळके, जालिंधर बुधवत, नरेश शळके यांच्यावतीने एका निवेदनाद्वारे देण्यात आला.

शहरामध्ये जयस्तंभ चौक शाळेसमोर सुरु असलेले, गॅरेज लाईन जयस्तंभ चौक ते विश्राम भवन, सुवर्ण नगर गणेश मंदीर, आठवडी बाजारातील देशी दारु दुकान, मच्छी मार्केट जवळील, इकबाल चौकातील, सिनेमा टाकी रोड समोरील दुकान व बसस्थाक परिसरातील अवैध वरली मटका व अवैघ धंदे आठ दिवसात बंद करण्यात यावे, अन्यथा आंदोलन महाविकास आघाडीच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात दिला असून विद्यार्थी व युवा पिढी व्यवसनाधिन होवून शहरातील संस्कृती धोक्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी महाविकास आघाडीचे लक्ष्मणराव घुमरे, प्रा.संतोष आंबेकर, दिलीप जाधव, बंडु काळवाघे, रवी पाटील, हेमंत खेडेकर, दत्ता काकस, सुनिल सपकाळ, अनिल बावस्कर, अशोक इंगळे, जाकीरभाई कुरेशी यांच्यासह शहरातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

अवैधधंदे बुलढाणा शहरातच चालतात का?

देशी दारुचा परवाना नसतांना प्रत्येक खेडेगावात दारु विक्री तसेच बाराही तालुक्यात अवैधधंदे व वरली मटका मोठ्या प्रमाणात सुरु आहे. जिल्ह्यातील बाराही तालुक्यातील तरुण व विद्यार्थी दारु, वरली मटक्याच्या आहरी जात आहे. वरली मटका काय, बुलढाणा शहरातच चालतो ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत असून महाविकास आघाडी संपूर्ण जिल्ह्यातील अवैधधंदे बंद करण्यासाठी केंव्हा आंदोलन करील, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

पाहू आता आठ दिवसानंतर काय होते !

आठ दिवसात बुलढाणा शहरातील अवैधधंदे व वरली मटका बंद होतो का? की महाविकास आघाडीला बुलढाणा शहर पोलिस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन छेडण्याची वेळ येते ? हे मात्र लवकरच समजेल, एवढे मात्र निश्चीत !