मलकापूर डी.बी.पथकाने 54 हजाराची दारु पकडली

74

BNU न्यूज नेटवर्क..
मलकापूर (28.Sep.2023) शहर डी.बी.पथकाने धडक कारवाई करीत 12 जणांच्या मुसक्या आवळीत त्यांच्याकडून 54 हजार 735 रुपयांची देशी विदेशी व हातभट्टीची दारु जप्त केली. सदर कारवाई 27 सष्टेंबर रात्री करण्यात आली.

दारु वैध की अवैध आखरी ती दारु असतेच पिल्यानंतर झिंग येणारच, देशी किंवा विदेशी दारुला अवैध विक्री म्हणता येत नाही. कारण ती कोणत्यातरी देशी दारुच्या दुकानात विकलेली असल्यामुळे त्याचा शासनाला कर मिळतोच. तर हातभट्टीची दारु ही अवैध असल्याने तिचा कोणत्याही प्रकारचा कर शासनाला मिळत नसल्याने तिला अवैध दारु म्हणता येते. गणेश विसर्जन असल्याने पोलिस अधिक्षक यांनी विशेष मोहिमेचे आयोजन केले होते. मलकापूर शहर पोस्टे.डी.बी.पथकाने 27 सप्टेंबर रोजी धडक कारवाई करीत मोहन सोनी, शंकर जाधव, प्रविध रणीत,गणेश वाघोदे, गुलाब पाटील सर्व रा.मलकापूर, प्रकाश पवार घिर्णी, रवी चंदनकर मलकापूर, निल्सन तायडे वाकोडी, बाळू म्हस्के वाघूड, पंकज भाकेर अकोला, कैलास नेरकर मलकापूर, संजय गवई पोफळी असा बारा जणांकडून देशी-विदेशी व हातभट्टीची 54 हजार 735 रुपयांची दारु जप्त करण्यात आली. सदर कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक, खामगाव अप्पर पोलिस अधिक्षक, मलकापूर उपविभागीय अधिकारी, मलकापूर पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाली सपोनी.करुणाशील तायडे, पोकाँ.प्रमोद राठोड, गोपाळ तारुळकर, पोकाँ.संतोष कुमावत, पोकाँ.आसिफ शेख, पोकॉ.ईश्वर वाघ, पोकाँ.प्रविण गवई यांच्या पथकाने केली.