BNU न्यूज नेटवर्क..
धा.बढे (30.Sep.2023) हुंडा देणे-घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरीसुध्दा हुंडा दिल्या व घेतल्या जातो. आणि लग्नात हुंडा कमी झाला म्हणून विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करुन तिला घराबाहेर काढून दिल्या जाते. असाच एक प्रकार देव्हारी ता.सोयगाव जि.संभाजीनगर येथे घडला. लग्नात हुंडा कमी झाला आता दुचाकीसाठी 1 लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावीत गर्भवती महिलेला घराबाहेर काढून दिल्याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरुन धा.बढे पोलिसांत पती, सासू, जेठ व जेठाणी या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
आरती आनंद राठोड रा.देव्हारी ता.सोयगाव जि.संभाजीनगर रा.ह.मु.गोतमारा ता.मोताळा या विवाहितेने धा.बढे पोलिसात फिर्याद दिली की, तिचे लग्न सन 2018 मध्ये देव्हारी ता.सोयगाव येथील आनंद राठोड यांच्यासोबत झाले होते. त्यांना 4 वर्षाचा एक मुलगा असून सदर विवाहिता 8 महिन्याची गर्भवती आहे. लग्न झाल्यानंतर सासरकडील लोकांनी दोन महीने चांगले वागविले. नंतर मुलांच्या वेळेस दिवस गेल्याने तुझा दवाखाना कोण करेल? तुला आम्ही दवाखान्यात नेणार नाही, तुझ्या आई-वडिलांनी हुंडयात आंदण व सोने कमी दिले, असे म्हणत पती आनंद राठोड हा वारंवार पैशाची मागणी करुन विवाहितेचा छळ करीत होता. उसनवारी करुन सोन्याची पोथ, फ्रिज, गादी, पलंग, कपाट व संसारउपयोगी वस्तु माहेरच्यांनी दिल्याचे विवाहितेने सांगून देखील मोटार सायकल घेण्यासाठी तुझ्या वडिलांकडून 1 लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला होता, दरम्यान पंचामार्फत व कोर्टामार्फत विवाहिता नांदायला गेली.सासु व पती नेहमी त्रास होता. सासु शिलाबाई बाबुराव राठोड, जेठ गजानन बाबुराव राठोड, जेठ विजया गजानन राठोड तु दुसरी बायको कर असे पतीला सांगत होते. लाथाबुक्यांनी मारहाण करुन घराबाहेर हाकलून दिल्याच्या विवाहितेच्या फिर्यादीवरुन धा.बढे पोस्टे. सासू, पती, जेठ व जेठाणी यांच्यावर भादंवीचे कलम 323, 34, 498 अ, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.