मोताळ्यात लोखंडी रॉडने रपारपी; चौघांवर गुन्हे दाखल !

69

मोताळा-(10 Oct.2023)शहरात काही दिवसापुर्वी एका युवकाच्या अपहरणाची घटना घडली होती. आता वातावरण थोंडे शांत होताच परत एका जणाला चौधांनी लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना 9 ऑक्टोबर रोजी मोताळा शहरात घडली. याप्रकरणी चौघांवर बोराखेडी पोस्टे.ला विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मोताळा येथील शेख हुसेन शेख सत्तार यांनी बोराखेडी पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, त्‍यांचा मावसभाऊ व चौघांमध्ये लग्न संबंधाच्या कारणावरुन वाद झाले होते. यावेळी शेख कासम इब्राहिम, शेख आजम शेख इब्राहिम, शेख अक्रम इब्राहिम व एक यांनी फिर्यादीच्या मावसभावास शिविगाळ करुन लोखंडी रॉड तसेच लाकडी काठीने मारहाण करुन जमखी केल्याच्या फिर्यादीवरुन उपरोक्त चार आरोपींवर बोराखेडी पोस्टे.ला भादंवीचे कलम 324, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोहेकाँ.अशोक आडोकार हे करीत आहेत.