दाताळा येथे दुचाकीची समोरासमोर धडक; 1 गंभीर

77

BNU न्यूज नेटवर्क..
मलकापूर (11.Oct.2023) बुलडाणा-मलकापूर रोडवरील दाताळा येथे दुचाकीची समोरासमोर धडक झाली. धडक एवढी भिषण होती, की या धडकेत दुचाकीने पेट घेतल्याने एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना आज बुधवार 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. जखमी युवकाला मलकापूर येथील एका रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार दाताळा येथील गोपाल नगरातील युवक आज 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.45 वाजता मलकापूरकडून दुचाकी क्र. आर.जे 52-इ-0299 ने दाताळाकडे जात असतांना टोल नाक्यासमोर मलकापूरकडे जाणाऱ्या दुचाकी एम.एच-28 ए.डब्ल्यू.-3673 ची समोरासमोर भिषण धडक झाली. या धडेकत दुचाकी क्र. आरजे 52-इ-0299 ने पेट घेतल्याने गाडीला आग लागली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गाडीवर पाणी टाकून आग विझवली. तोपर्यत या गाडीवरील गायकवाड नामक युवक जखमी झाला, त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने त्याला पुढील उपचारार्थ मलकापूर येथील एका हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. वृत्तलिहेपर्यंत मलकापूर ग्रामीण पोस्‍टे.ला घटनेची नोंद नव्हती.