देऊळघाट येथे शेतकऱ्याच्या एका लाखावर चोरट्यांचा डल्ला !

78

बुलढाणा-(17 OCT.2023) चोर केंव्हा चोरी करतो, हे सांगता येत नाही. परंतु तो पुरेपूर माहिती मिळविल्यानंतर चोरी करतो, हे चोरट्यांची विशेष खासीयत गोष्ट असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. अशीच एक घटना बुलढाणा ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या देऊळघाट घडली, तेथील प्रमोद जाधव यांचे कपाट फोडून चोरट्याने रोख 1 लक्ष 8 हजार रुपये लंपास केल्याची घटना 16 ऑक्टोबर रोजी घडली. याबाबत पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

बुलढाणा शहरापासून 3 कि.मी.अंतरावर असलेल्या देऊळघाट येथील प्रमोद भगवानराव जाधव यांनी बुलढाणा ग्रामीण पोलिसांत दिेलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते बटाईने शेती व दुग्ध व्यवसाय, तसेच गावात त्यांचे कृषी केंद्र आहे. रविवार 15 ऑक्टोबर रोजी घटनास्थापना असल्याने दिवसभराची कामे आटोपून ते रात्री 11 वाजता झोपले होते. सकाळी 4.45 वाजेच्या दूध काढण्यासाठी उठले तेंव्हा त्यांना गुरांच्या गोठ्याकडे जाणारा दरवाजा उघडा दिसल्याने दरवाजा लोटून जाधव हे दूध काढण्यासाठी निघून गेले. दूध काढून आल्यानंतर त्यांना कपाटाचे लॉकर उघडे दिसून त्यातील रोख रक्कम 1 लक्ष 8 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केल्याच्या फिर्यादीवरुन बुलढाणा ग्रामीण पोस्टे.ला अज्ञात चोरट्यावर भादंवीचे कलम 380, 457 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.