बुलढाणा -मानस फाउंडेशनच्या माध्यमातून भरीव रचनात्मक कार्य करणारे प्रा. डी एस लहाने यांचा सन्मान विधवा भगिनींच्या वतीने मंगळवार 21 एप्रिल रोजी सन्मानपत्र देऊन करण्यात येत आहे.
विधवा महिलांची चळवळ बुलढाण्यात सुरू करून देश पातळीवर तिची दखल घेण्यास लहाने यांनी भाग पाडले.खूप दिवसांनी विधवा महिलांना हक्काचा भाऊ मिळावा अशा पद्धतीचे उपक्रम राबवून विधवा व एकल महिलांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम प्राध्यापक लहाने करीत आहे. महिलांना रोजगार देणे,त्यांना आत्मनिर्भरतेचे धडे देणे, विधवा महिलांना स्वीकारून त्यांच्या मुलावर अधिक प्रेम करा असे सांगत समाजामध्ये त्यांना प्रतिष्ठा देण्याचे काम मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. लहाने सर गेल्या काही वर्षांपासून करीत आहे. महिलांना याचा मोठा लाभ झाला आहे. त्या ऋणातून उतराई व्हावे म्हणून मंगळवार 21 मार्च रोजी सकाळी ११वाजता शिवसाई युनिव्हर्सल येथे सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. याप्रसंगी सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभणार आहे.



























