पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने घेतला गळफास

70

पत्नीसह सासरच्या पाच जणाविरुध्द गुन्हा दाखल

नांदूरा: हुंड्यासाठी पत्नीचा शारिरीक व मानसीक छळ केल्याप्रकरणी पतीवर व सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल झाल्याच्या घटना ऐकायला मिळाल्या असतील, परंतु नांदुऱ्यात काही विपरीत घडले. पत्नी व सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून एका 33 वर्षीय युवकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना 24 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. युवकाचे नाव संतोष उर्फ नितेश राजू सोनवाल असे आहे.

नांदूरा शहरातील आठवडी बाजार येथील संतोष उर्फ नितेश राजू सोनवाल यांचे अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील प्रीती नितेश सोनवाल या बयेशी लग्न झाले होते. लग्नानंतर दोघेही विभक्त झालेले असून पत्नी प्रीती सोनवाल हे मृतक संतोष उर्फ नितेश राजू सोनवाल याला फारकत देण्यासाठी 16 लाखांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा प्रीती व तिच्या नातेवाईंकाडून दिल्या जात होत्या. या त्रासाला कंटाळून संतोष सोनवल याने 24 फेब्रुवारीचे सायंकाळी साडेपाच वाजता शहराजवळील मरी मातेच्या मंदिराचे बाजूला असलेल्या पडीक शेतामध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याच्या मृतकाची आई आशाबाई सोनवाल यांच्या फिर्यादीवरुन नांदूरा पोस्टे.ला मृतकाची पत्नी प्रीती सोनवाल, ज्योती चावरिया, निलेश चावरिया, मोहित चावरिया,रा. बाळापूर व आनंद दाबोडे रा.एरंडोल यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भादंवीचे कलम 306, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.