सासुने ‘बेवळ्या’ जावाईबापूला बॅटीने केला ठार !

41

शेगाव तालुक्यातील जवळा बु.येथील जिगरबाज सासुचा कारनामा

शेगाव: आई मुलीला हातावरल्या फोडाप्रमाणे जपते, वयात आली की तीचे लग्न करुन देते. लग्न झाल्यावर हरीद्वार काशी झाल्यासारखे वाटते. मुलगी सासरी सुखी रहावी असे आईला वाटते. परंतु त्रस्त झाल्याने जीवापाड जपलेल्या मुलीच्या ‘बेवळ्या’ नवऱ्याला संपविण्याची वेळ सासु सुशिला काळे या महिलेवर आली. तीने 22 फेब्रुवारी रोजी दारुड्या जावायाचा बॅटीने मुर्दा पाडल्याची घटना जबळा बु.येथे घडली. पोलिसांनी आरोपी सुशीला काळे हीच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला.

दारुड्याला दारु पिण्याचा काळवेळ नसतो, तो कधीही चिंग राहतो. असाच शेगाव येथील दिपक गजानन हाडोळे हा 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी जवळा बु. येथे सासूच्या घरी गेला. त्याने दारु पिवून सासूच्या घरासमोर मोठा धिंगाणा घालत त्याने लाथा मारुन घरासमोरील गेट तोडले, एवढ्यावर पठ्ठया थांबला नाही. त्याने दगडाने घराचे दार जोरजोरात ठोकल्याने संतापलेल्या सासू सुशीला अवधूत काळे (वय 52) यांचा राग अनावर झाला. सासुने रौद्ररुप धारण करीत मागच्या दाराने येवून जावाईबापू दिपकच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून बॅटीने चौके, छक्के मारीत बॅट तुटेपर्यंत मारहाण केल्याने दिपक हाडोळे याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जवळा बु. येथे घडल्याने गावात एकच खळबळ उडाली. घटना वाऱ्यासारखी गावात पोहचली. शेगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. याप्रकरणी मृतकाची पत्नी वैष्णवी दिपक हाडोळे हीच्या फिर्यादीवरुन शेगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी सुशीला काळे हीच्याविरुध्द भादंवीचे कलम 302 चा गुन्हा दाखल करुन तीला अटक केली आहे.
000