अनैतिक देहव्यापाराविरुध्द एलसीबी अ‍ॅक्शन मोडवर!! पाच जणांच्या मुसक्या आवळल्या; दोन पीडित महिलांची केली सुटका !

51

शेगाव: देश विदेशातून भाविक श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी शेगावी येतात. शेगाव या पवित्र भूमिला काही समाजकंटक कलंक लावित महिलांना अमिषे देवून नैतिक देहव्यापार करुन घेतात. स्थानिक गुन्हा शाखेने ॲक्शन मोडवर येत पाच जणांच्या मुसक्या आवळीत दोन पीडित महिलांची सुटका केली. आरोपींकडून 1 लाख 24 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई 8 मे रोजी करण्यात आली.

संत नगरीत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात. याचाच फायदा घेत काही समाज कंटक महिलांच्या गरीब परिस्थीती व त्यांना पैश्याचे अमिष दाखवून त्यांना शेगाव येथे बोलावून त्यांच्याकडून देहव्यापार करुन घेतात. स्थागुशाने गोपनीय माहितीवरुन 8 मे रोजी पथकाने शेगाव येथे डमी ग्राहक तयार करुन सापळा करीत दोन पीडित महिलांची सुटका करीत पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपीवर शेगाव शहर पोलिसांत भादंवीचे कलम 4, 5, 6 स्त्रीया व मुली अनैतिक व्यापार(प्रतिबंध) अधिनियम 1956 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. स्थागुशाने देह व्यापारात अडकलेल्या कल्याण येथील 27 वर्षीय महिला व मुंब्रा जि.ठाणे येथील एका 21 वर्षीय महिलेची सुटका केली. गुन्ह्याचा पुढील तपास शेगाव शहर पोस्टे.चे पोलिस निरिक्षक हे करीत आहे.

आरोपी पंचवीशीच्या आतले

महिलांना देहव्यापाराच्या दलदलीत फसवणाऱ्या प्रेम गणेश लहाने (वय 20) जवळा ता.शेगाव, सुरज चिंचोलकर रा.शेगाव, अमोल प्रकाश बांगर (वय 21) बावणबीर ता.संग्रामपूर, सुमित सखाराम जाधव (वय 21) रा.शेगाव, सागर अनिल सारवान (वय 19)रा.शेगाव यांच्या मुसक्या आवळीत त्यांच्याकडून 30 हजाराचे तीन मोबाईल, दोन दुचाकी 90 हजार रुपये, नगदी 4 हजार 600 रुपये व इतर असा एकूण 1 लाख 24 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई

जिल्हा पोलिस अधिक्षक सुनिल कडासणे, अप्पर पोलिस अधिक्षक बी.बी.महामुनी, अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे प्रभारी पोलिस निरिक्षक अशोक लांडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिक्ष चेचरे, सफौ.गजानन माळी, पोहेकाँ.राजेंद्र टेकाळे, पोना.गणेश पाटील,विक्रांत इंगळे, मपोकाँ.अनुराधा उगले, पोहेकाँ.समधान टेकाळे, विजय मुंढे यांच्या पथकाने कारवाई कली.