मोताळा तालुक्यातील पुन्हई फाट्याजवळ भीषण अपघात ! दुचाकी झाडावर आदळली; दोघजण जागीच ठार !

25

मोताळा: बोराखेडी-वडगाव रोडवर पुन्हई फाट्याजवळ दुचाकी झाडावर आदळली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवार 3 जून रोजी सायंकाळी 5.15 वाजेच्या सुमारास घडली. मृतकांची नावे गजानन सोळंके व दिपक पवार असे आहेत.

तालुक्यातील लिहा येथील आर्मीमध्ये नोकरीला असलेले गजानन जगदेव सोळंके व त्यांचा मावसभाऊ दिपक महादेव पवार हे काही कागदपत्रासाठी मोताळा येथे आले होते. 3 जून रोजी गजानन सोळंके हे मोताळा येथून दुचाकी क्र. एम.एच.28 एएक्स-5705 ने गावाकडे जात होते. त्यांच्या पाठीमागे त्यांचा मावसभाऊ दिपक पवार बसलेला होता. वादळी वारा व पावसामुळे पुन्हई येथील एका वळणावर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी झाडावर आदळली, यामध्ये फौजी गजानन सोळंके व दिपक पवार यांचा जागेवरच मृत्यू झाला. दिपक पवार हा अंत्री येथील राहणारा असून तो पुणे येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. गजानन सोळंके यांच्या पश्चात पत्नी व मुलगी असा आप्त परिवार.