आमदारकीचे प्रबळ दावेदार अ‍ॅड.संजय राठोड यांच्या वाढदिवशी विविध कार्यक्रम !! मोताळ्यात आरोग्य शिबिर; 208 रुग्णांची करण्यात आली तपासणी !

30

मोताळा: बुलढाणा विधानसभा मतदार संघाच्या आमदारकीच्या टिकीटाचे प्रबळ दावेदार म्हणून अव्वलस्थानी असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड.संजय राठोड यांचा वाढदिवस 21 ऑगस्ट रोजी आरोग्य शिबिर यासह आदी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ग्रामीण रुग्णालय मोताळा येथे आयोजित शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी 208 रुग्णांची केली. त्यातील 25 रुग्णांना पुढील शस्त्रक्रियेसाठी 24 ऑगस्ट रोजी जळगाव खांदेश येथील गोदावरी हॉस्पीटल येथे पाठविण्यात येणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘संजुभाऊ राठोड तूम आगे बढो’च्या घोषणा देत त्यांना आमदार म्हणून निवडून आणण्याचा संकल्प केल्याने आगामी विधानसभा निवडणूक चुरशीचे होण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे.

मृदु व शांत स्वभावाचे अ‍ॅड.संजय राठोड हे नेहमी मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या सुखा-दु:खात सहभागी होवून त्यांच्या तोरणादारी व मरणादारी उपस्थित राहतात. सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी ते शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करुन न्याय देतात. ग्रामीण रुग्णालय मोताळा येथे आज बुधवार 21 ऑगस्ट रोजी अ‍ॅड.संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन नगर पंचायत नगराध्यक्ष श्रीमती माधुरीताई देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष गजानन मामलकर हे होते. आरोग्य शिबिरात जवळपास 208 रुग्णांची तज्ज्ञ एम.डी.डॉ.पारितोष मुलीरवार, एम.एस.सर्जन डा.सुमित भोसले, डॉ.जान्हवी मापारी यांनी तपासणी केली. यावेळी पीआरओ आमीन तडवी व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 25 रुग्णांना मोफत उपचारासाठी गोदावरी फाऊंडेशन जळगाव खांदेश येथे पाठविण्यात येणार आहे. शिबिराच्या यशस्वीतेसाठी तालुका युवक काँग्रेसने परिश्रम घेतले. या कार्यक्रमास मिलींद जैस्वाल, सलीम चुनेवाले, जलील मख्यी, कैलास खर्चे, रवी पाटील, उषाताई नरवाडे, विष्णू शिराळ, रामेश्वर काळंगे, प्रेमकुमार धुरंधर, शेख रफिक, मदन पाटील, भिका घोंगडे, विजू खोंदले, विनोद वानखेडे, राजेंद्र सावळे, भागवत नप्ते, उल्हाल पाटील, श्याम कानडजे, ग्रामीण रुग्णालय मोताळा व गोदावरी फाऊंडेशनचे डॉक्टर्स, कर्मचारी तसेच युवक काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेसचं जनतेला न्याय देवू शकते:अ‍ॅड.संजय राठोड

देशात जातीवादी पक्षाची सत्ता असल्यामुळे जनतेचे अत्यंत हाल होत आहे. वसुलीमुळे कायद्याचा वचक राहिला नसल्याने अल्पवयीन मुली व स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याच्याराच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. राज्यात घडणाऱ्या घटनांमुळे शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली दिल्या जात असून महाराष्ट्राला काळीमा फासल्या जात आहे. बेरोजगारांची संख्या वाढली असून शेतकरी आत्महत्येत मोठी वाढ झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम फक्त काँग्रेस पक्षच करू शकते, त्यासाठी सर्वांनी खंबीरपणे काँग्रेसच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन अ‍ॅड.संजय राठोड यांनी केले.

थड येथे संजुभाऊंचा भव्य सत्कार

तालुक्यातील श्रीक्षेत्र संत गजानन महाराज जन्मस्थळ थड येथे महात्मा गांधी प्रतिष्ठानच्यावतीने अ‍ॅड.संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी संजुभाऊंचा भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तुळशीराम नाईक यांनी केले. या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे इंड्रस्टी सेलचे डॉ.हेमंत सोनारे, इन्फोलिंकचे मॅनेजींग डायरेक्टर कौस्तुभ हुलके, बुलढाणा विधानसभा समन्वयक अ‍ॅड.गणेशसिंग राजपूत, महिला काँग्रेसच्या नीताताई पाटील, शकुंतला पाटील, मिलिंद जयस्वाल, अवि पाटील, संजय किनगे, सुरेश सरोदे, कैलास गवई, महेंद्र गवई, सुरेश इंगळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन मिलिंद जयस्वाल यांनी केले.

30 ऑगस्टला बुलढाण्यात रोजगार महोत्सव

अनेक तरुणांनी शिक्षण घेतले, मात्र त्यांना रोजगाराचा संधी मिळाली नसल्यामुळे ते आजही बेरोजगारच आहे. तरुण-तरुणींना रोजगार सुरु करण्याची संधी देण्यासाठी अ‍ॅड.संजय राठोड यांच्यावतीने 30 ऑगस्‍ट रोजी जिजामाता स्टेडीयम, बुलढाणा येथे सकाळी 9.30 वाजता रोजगार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशातील 50 पेक्षा अधिक कंपन्या सहभागी होणार असून ज्यामध्ये आयटी. बँकींग, मॅन्युफॅक्चरींग रिटेल, अग्रीकल्चरल, फायनान्स, फार्मा, नर्सिंग, डिलीव्हरी बॉय, लॉजिस्टीक्स क्षेत्रातील नामवंत कंपन्या या रोजगार महोत्सवात सहभागी होणार असून 5000 पेक्षा अधिक पदांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार असून पात्र उमेदवापरांना तात्काळ नियुक्त्या दिल्या जाणार आहे. इच्छूक उमदेवारांनी अधिक माहितीसाठी मोताळा तालुक्यात रामकृष्ण भराड मो. 9423478349, अक्षय मांझा मो.7744078382, अनिरुध्द झनके मो-9075307407 तर बुलढाणा तालुक्यात सचिन चौधरी मो.7720964590, विजय वासे मो.7559412376, गौरव बोरडे मो.9309172594 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.