Wednesday, May 13, 2026
Home Buldana रोहिणखेड येथील युवक पुरात वाहून गेला

रोहिणखेड येथील युवक पुरात वाहून गेला

99

मोताळा: तालुक्यातील रोहिणखेड येथील 25 वर्षीय युवक पुरात वाहून गेल्याची दुदैवी घटना शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मात्र, तिघांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. वाहून गेलेल्या युवकाचे नाव अनिसशहा मकसूद शहा असे असून त्याचा रात्री उशीरापर्यंत शोध लागला नव्हता.

रोहिणखेड येथील नळगंगा नदीत शुक्रवार २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान अनिसशहा मकसूद शहा, मोहमंद अफजल, बशीरशहा बाबाशहा, मोहमंद अयेसान मो.लुकमान हे चार युवक पोहत होते. दरम्यान, डोंगरात जोरदार पाऊस झाल्याने नदीला अचानक पूर आल्याने नदीत पोहणाऱ्या युवकांची चांगलीच धांदल उडाली. त्यांनी आरडाओरड केल्याने त्यांना वाचविण्यासाठी जीवाची पर्वा न करता गावातील जीवन राजनकर, मोहमंद अरबाज, ऋषीकेश जंवजाळकर यांनी नदीमध्ये उडी घेत मोहमंद अफजल, बशीरशहा बाबाशहा, मोहमंद अयेसान मो.लुकमान यांना बाहेर काढल्याने त्यांचे जीव वाचले, मात्र अनिसशहा मकसूद शहा (वय २५) हा युवक वाहून गेला. त्याचा रात्री उशीरापर्यंत शोध लागला नव्हता.

Don`t copy text!