Wednesday, May 27, 2026
Home Buldana क्यूआर कोडद्वारे खत बुकिंगची नवी सुविधा; खरीप हंगामात ‘FSAS’ प्रणालीद्वारे खत विक्रीला...

क्यूआर कोडद्वारे खत बुकिंगची नवी सुविधा; खरीप हंगामात ‘FSAS’ प्रणालीद्वारे खत विक्रीला प्रारंभ

1

बुलढाणा- केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखडा प्रकल्पांतर्गत IFMS आणि Agristack प्रणालीचे एकत्रीकरण करण्यात येत असून, खत विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी “Fertilizer Sale Application System (FSAS)” हे मोबाईल आधारित अँप विकसित करण्यात आले आहे. या नव्या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना QR कोडच्या माध्यमातून खतांचे ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे.

शेतकऱ्यांनी QR कोडद्वारे खत बुकिंग केल्यानंतर संबंधित QR कोड तीन दिवस वैध राहणार असून, या कालावधीत शेतकरी आपल्या सोयीच्या वेळेनुसार निवडलेल्या खत विक्रेत्याकडून खत खरेदी करू शकतील. ऑनलाईन बुकिंग सुविधेमुळे खतासाठी दुकानांसमोर रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. तसेच आवश्यक त्या खतांचेच बुकिंग करता येणार असल्याने दुकानदारांकडून इतर अनावश्यक खते घेण्याची सक्ती टाळली जाईल. त्यामुळे खत विक्री प्रक्रियेत अधिक सुलभता, पारदर्शकता आणि शेतकरी हिताचे वातावरण निर्माण होणार आहे.

सध्या अनेक वेळा दुकानांमध्ये खत उपलब्ध आहे की नाही, याची माहिती शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. FSAS प्रणालीमुळे खत उपलब्धतेची माहिती वेळेवर मिळणार असून शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम वाचण्यास मदत होणार आहे. केंद्र शासनाच्या तांत्रिक पथकाने पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील अष्टापूर येथे या वितरण प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे. त्यानंतर राज्यातील कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांची पथदर्शी प्रकल्पासाठी निवड करण्यात आली असून, आगामी खरीप हंगामात FSAS प्रणालीद्वारे खत विक्रीची सुरुवात करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे खत वितरण व्यवस्थेमध्ये डिजिटल परिवर्तन होऊन शेतकऱ्यांना अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ सेवा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे

शेतकऱ्यांनी काय करायचं?

FSAS App डाउनलोड करा: Play Store वर ‘Fertilizer Sale Application System’ सर्च करा.नोंदणी: आधार/Mobile नंबरने रजिस्टर करा. Agristack शी लिंक असेल.खत निवडा: हवं ते खत, कंपनी, प्रमाण निवडून QR कोड जनरेट करा.खरेदी: 3 दिवसांत जवळच्या निवडलेल्या दुकानात जाऊन QR दाखवा आणि खत घ्या.थोडक्यात: दुकानदारांची मनमानी बंद होणार, वेळ वाचणार, आणि पाहिजे तेच खत मिळणार.

Don`t copy text!