Wednesday, April 22, 2026
Home Buldana सिमेंटचे पोल घेवून जाणारे ट्रॅक्टर ट्रॉली पलटी; दोन ठार!

सिमेंटचे पोल घेवून जाणारे ट्रॅक्टर ट्रॉली पलटी; दोन ठार!

123

मोताळा तालुक्यातील पुन्हई रोडवरील दुदैवी घटना..!!

मोताळा: नांदुरा तालुक्यातील फुली येथून सिमेंटचे पोल घेवून जाणारे ट्रॅक्टरची ट्रॉली पुन्हई फाट्याजवळ पलटी झाले. पोल अंगावर पडल्यामुळे पाचजण गंभीर जखमी झाले. सदर घटना आज रविवार 22 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. जखमींना मोताळा ग्रामीण रुगालयातून बुलढाणा येथे हलविण्यात होते. उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू झाला. मृतक नांदुरा तालुक्यातील वाडी महाळुंगी येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

फुली येथून ट्रॅक्टर क्र.एम.एच.40 ए-3487 सिमेंटचे पोल घेवून बोराखेडी वडगाव रोडने चालले होले. ट्रॅक्टरमध्ये पाच ते सहा मजूर होते. दरम्यान, ट्रॅक्टरची ट्रॉली पुन्हई फाट्याजवळील एका वळणावर पलटी झाल्याने सिमेंटचे 11 पोल मजुरांच्या अंगावर पडल्याने यामध्ये रामदास बेलोकार (वय 40), संतोष बेलोकार (वय 35), हरीश बेलोकार (वय 23), मंगेश सातव (वय 32), शुभम खंडारे (वय 21) हे मजूर पोलखाली दबून गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी पोहचून जखमींना बाहेर काढले. पोलिसांना माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी ट्रॅक्टर बाजुला काढून पोलिस स्टेशनला लावले. जखमींना ग्रामीण रुग्णालय, मोताळा येथून पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे नेण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान वाडी महाळुंगी येथील मंगेश ज्ञानदेव सातव व रामदास पुंजाजी बेलोकार यांचा मृत्यू झाला. इतर जखमीवर बुलढाण्यातील एका हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. वृत्तलिहेपर्यंत बोराखेडी पोलिसात सदर घटनेची फिर्याद दाखल नव्हती.

Don`t copy text!