ऑनलाईन शिक्षणाची गंगा घराघरात पोहचविणार:विजयराज शिंदे

17

शालेय विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्कात एलईडी टीव्ही.चे वाटप

बुलढाणा: कोरोना काळात शिक्षणाचे होत असलेले शैक्षणीक नुकसान रोखण्यासाठी शासनाने ऑनलाईन शिक्षण व्यवस्थेची संकल्पना पुढे आणली. या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता यावे. यासाठी केंद्र सरकारच्या स्वयंप्रभा ऑनलाईन एज्युकेशन कौन्सिल व शिवानी आयटी.हार्डवेअर ॲड डिस्ट्रीब्युटर्सच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षणाची गंगा घराघरात पोहचविणार असल्याचे, प्रतिपादन माजी आमदार विजयराज शिंदे यांनी केले.

शहरातील राजे गार्डन येथे रविवार 29 सप्टेंबर रोजी माजी आमदार विजयराव शिंदे यांच्याहस्ते शेकडो शालेय विद्यार्थ्यांसाठी नाममात्र शुल्कात 40 इंची एलईडी टीव्हीचे वाटप करण्यात आले. त्यावेळी शिंदे बोलत होते. पुढे बोलतांना विजयराज शिंदे यांनी जागतिकीकरणाच्या युगात टिकण्यासाठी सर्वसामान्य ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी टीव्ही. एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे. एलईडी स्मार्ट टीव्ही.विविध प्रकारचे शालेय ॲप समाविष्ठ करण्यात आले असून त्याद्वारे पहिली ते उच्चशिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार असून शिक्षणाची गंगा घराघरात पोहोचविण्याचा संकल्प विजयराज शिंदे यांनी केला आहे. या कार्यक्रमास जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे, पत्रकार लक्ष्मीकांत बगाडे, भाजपा कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता शिंदे तसेच भाजपाचे महादेव शिराळ, सचिन शेळके, अनंता शिंदे यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने हजर होते.

राजे गार्डन येथे पहिल्या टप्प्याचे वाटप

रविवार 29 सप्टेंबर रोजी राजे गार्डन येथे मोठ्या थाटात या उपक्रमाचा पहिला टप्प्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामीण व शहरी भागातील शेकडो विद्यार्थी व पालकांनी विजयराज शिंदे यांनी यांच्याहस्ते एलईडी टीव्ही.स्वीकारला. यावेळी विद्यार्थी व पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता.