Wednesday, May 20, 2026
Home Buldana वृध्दांनो सावधान! जळगाव खांदेशच्या चोरट्याची मोताळ्यात दस्तक !! 35 हजाराची सोन्याची अंगठी...

वृध्दांनो सावधान! जळगाव खांदेशच्या चोरट्याची मोताळ्यात दस्तक !! 35 हजाराची सोन्याची अंगठी पळविली; गुन्हा दाखल

88

मोताळा- वृध्दांनो सावधान..!जळगाव खांदेशच्या चोरट्यांनी मोताळ्यात दस्तक दिली असून ­’त्या’ 51 वर्षीय चोरट्याने 65 वर्षीय वृध्दाला पुढे चेकींग चालू असल्याची बतावणी करीत 35 हजार रुपयांची अंगठी लंपास केली. सदर घटना मोताळा येथील गुरुवारच्या आठवडी बाजारात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी 4 ऑक्टोबर रोजी बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुर्ती ता.मोताळा येथील दामोधर रामु सोनुने (वय ६५) यांनी बोराखेडी पोलिसात फिर्याद दिली की, ते गुरुवारचा आठवडी बाजार असल्याने बाजारात आले होते. दरम्यान, सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मुलींचे शासकीय वस्तीगृहासमोर डिगांबर कौतिक मानकरे शिवशंकर नगर, जळगाव खांदेश याने सोनुने यांना समोर चेकींग चालू असल्याची बतावणी करीत हातातील अंगठी काढून घेण्याचे सांगितले. सोनुने हे हातातील अंगठी काढून घेत असतांना चोरटा डिगांबर मानकरे याने दामोधर सोनुने यांच्या हाताला झटका देत ३५ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम सोन्याची अंगठी घेवून पोबारा केला. पोलिसांनी चोरट्याला पकडले असून सोनुने यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी मानकरे याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहे.

Don`t copy text!