Tuesday, May 5, 2026
Home Buldana रामनवमीनिमित्त मोताळ्यात भव्य शोभायात्रा; ‘जय श्रीराम’ जयघोषाने दुमदुमले शहर !

रामनवमीनिमित्त मोताळ्यात भव्य शोभायात्रा; ‘जय श्रीराम’ जयघोषाने दुमदुमले शहर !

31

मोताळा : सियाराम मित्र मंडळ व रामभक्तांच्यावतीने शहरातील प्रभाग क्र.5 मध्ये मागील 15 वर्षापासून श्रीराम जन्मसोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा केला जातो. यावर्षी गुरुवार 26 मार्च रोजी दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मसोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. रामभक्तांच्या हस्ते आरती करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. महिला भगिणींनी प्रभु श्रीरामचंद्रांचे विविध गिते व रामाचा पाळणा गायला. त्यानंतर हजारो भाविकांना ‍शिस्तबध्द पध्दतीने महिला व पुरुषांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

गुरुवार 26 मार्च रोजी शहरातील नांदुरा रोडवरील हनुमान संस्थान संकूल दुर्गानगर येथे प्रभु रामचंद्र यांच्या भव्य मुर्तीला सियाराम मित्र मंडळ व रामभक्तांनी हारअर्पण करुन दर्शन घेतले. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मिरवणुकीस सुरुवात झाली. रथात श्रीरामप्रभू यांची भव्य मुर्ती विराजमान करुन डीजेच्या निनादात आठवडी बाजारापासून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी रामभक्त रामभक्तीत तल्लीन झाले होते. रथयात्रेच्या स्वागतासाठी महिलांनी सडा सिंपडून रांगोळया काढून श्रीरामचंद्राचे दर्शन घेतले. मिरवणुकीत महिला व मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

मिरवणुकी दरम्यान ठिकठिकाणी रामभक्तांच्या ‘जय, जय श्रीराम’ घोषणांनी शहरातील वातावरण भक्तीमय झाले होते. श्रीराम नववी उत्सव जय सियाराम समितीच्या वतीने मागील 15 वर्षापासून साजरा करण्यात येतो. मिरवणुकीत श्रीराम भक्तांमध्ये मोठा उत्साह संचारलेला होता. या शोभायात्रेचे नियोजन सियाराम मित्रमंडळ व समस्त रामभक्तांच्यावतीने करण्यात आले होते. मिरणुकीत बोराखेडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सिताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजेंद्र कपले, नापोकाँ.प्रविण पडोळ, बीट जमादार अशोक अडोकार, पोहेकाँ.नंदकिशोर धांडे, पोकॉ.गणेश सुर्यवंशी, पोकाँ. मंगेश पवार, पोकाँ.कपिल कशपाग, पोकाँ.रमेश नरोटे, पोकाँ.ज्ञानेश्वर धामोडे, पोकाँ.श्रीकांत चिंचोले, महिला पोलिस तथा पुरुष व महिला होमगार्ड तसेच बुलढाणा येथील पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता.

दुष्ट शक्तींच्या संहारासाठी रामाचा अवता

श्री रामचंद्रजींचा जन्म राणी कौशल्याच्या पोटी राजा दशरथाच्या घरी चैत्र शुद्ध नवमी झाला. हिंदू धर्मग्रंथानुसार, त्रेतायुगात रावणाच्या अत्याचारामुळे नष्ट झालेल्या धर्माच्या आणि सामाजिक नीतीमूल्यांच्या पुनर्स्थापनेसाठी भगवान विष्णूंनी ‘राम’ म्हणून सातवा अवतार घेतला. मृत्यूच्या जगात श्रीराम म्हणून अवतार दुराचारी रावणाचा वध करुन नागरिकांना धर्माचा मार्ग दाखविला, अशी हिंदु धर्मग्रंथात नोंद आहे.

Don`t copy text!