Tuesday, May 26, 2026
Home Buldana मोताळा तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर

मोताळा तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर

32

बुलढाणा : राज्य निवडणूक आयोगाकडून घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार मोताळा तालुक्यांतील तीन ग्रामपंचायतींच्या रिक्त थेट सरपंच व सदस्यांच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये तालखेड, गुळभेली, गोतमारा असे 3 रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदाच्या जागासाठी निवडणूक होणार आहे. या ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू असून निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मोताळा तहसिलदार तथा ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे : निवडणूकीची अधिसूचना सोमवार 30 मार्च रोजी संबधित तहसिल कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. या कार्यक्रमानुसार निवडणुकीकरीता नामनिर्देशनपत्र 7 ते 13 एप्रिल पर्यंत सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेदरम्यान स्वीकारले जाणार आहे. नामनिर्देशन पत्र छाननी बुधवार 15 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपासून छाननी संपेपर्यंत. 17 एप्रिल रोजी नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. या निवडणूकीचे मतदान मंगळवार 28 एप्रिल रोजी सकाळी 7.30 ते सायं 5.30 वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी बुधवार 29 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे, असे प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Don`t copy text!